Ira Khan Weight Gain intagram
मनोरंजन

Ira Khan Weight Gain | वाढत्या वजनाने त्रस्त आमिर खानची कन्या, सांगितलं नुपूर शिखरेसोबतच्या नात्यावर कसा झाला परिणाम?

Ira Khan Weight Gain | वाढत्या वजनाने त्रस्त आमिर खानची मुलगी, सांगितलं नात्यावर कसा झाला परिणाम?

स्वालिया न. शिकलगार

आमिर खानची मुलगी इरा खान हिनं अलीकडेच तिच्या वजनवाढीबाबत आणि त्याचा तिच्या वैयक्तिक नात्यांवर कसा परिणाम झाला याबद्दल स्पष्टपणे सांगितलं. फिटनेसपेक्षा मानसिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं ती म्हणाली. समाजाकडून मिळणाऱ्या टीका, टोमणे आणि अपेक्षांमुळे मानसिक ताण वाढल्याचं मान्य करत, योग्य जोडीदार आणि सपोर्ट सिस्टममुळे ती या सगळ्यातून सावरू शकली, असा प्रामाणिक अनुभव तिनं शेअर केला.

Ira Khan Weight Gain effect on relationship

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, नैराश्य आणि क्षिटनेसबद्दल मोकळेपणानं बोलणारी इरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे - वजन. तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या नातेसंबंधांवर झालेला परिणाम झाला?

डिप्रेशनशी संघर्ष

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी इरा खान डिप्रेशनशी झुंजत आहे. तिने अनेक वेळा नैराश्य आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलले आहे. पण, आता तिचे वाढलेले वजन आणि शरीराची ठेवण, लठठपणा यांबद्दलही ती तितकीच स्पष्ट आहे. तिला वाढलेल्या वजनामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तिच्या नात्यात समस्या येत असल्याचे तिने स्वीकारले आहे.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने लठ्ठपणाबद्दल सांगितले आहे. ती व्हिडिओमध्ये म्हणाली, "हो, मी लठ्ठ आहे. मी माझ्या वय आणि उंचीमुळे लठ्ठ आहे. २०२० पासून, मी शरीराच्या प्रतिमेबद्दल संघर्ष करतेय. मी माझ्या नात्याशी देखील झुंजत आहे. याचा माझ्या आयुष्यातील अनेक पातळींवर परिणाम झालाय. माझे मित्रांसोबतचे नाते, माझे पती नुपूर शिखरे यांच्याशी असलेले नाते, माझे स्वाभिमान आणि काम करण्याची माझी क्षमता सर्व काही..याचा परिणाम कधीकधी नैराश्याइतकाच तीव्र असतो."

इरा खानने स्पष्टपणे सांगितले की, तिला या समस्येबद्दल सांगायचे आहे, तिने ज्या ज्या गोष्टी हाताळल्या, संघर्ष केला, त्याबद्दल बोलायचे आहे.

इरा म्हणाली, "मला आशा आहे की यामुळे मला मदत होईल."

इन्स्टा कॅप्शनमध्ये काय म्हणाली इरा?

तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, "२०२० पासून, मला अयोग्य, जास्त वजन आणि लठ्ठपणा जाणवत आहे. बोलण्यासारखे बरेच काही आहे. अजूनही अनेक गोष्टी मला समजायच्या आहेत. पण मला थोडे सकारात्मक वाटत आहे, म्हणून मी त्याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. मी नैराश्याबद्दल बोलताना जितकी स्पष्ट आणि आत्मविश्वासू होते तितकी मी कदाचित राहणार नाही. त्याबद्दल बोलणे माझ्यासाठी सोपे नाही. ते थोडे भयानक वाटते...मी फक्त माझे अनुभव शेअर करत आहे. कृपया स्वतः कमेंट सेक्शनमध्ये जाण्याचा धोका पत्करावा, कारण मी त्यापासून दूर राहते."

तिने स्वत: स्वीकारले आहे की, ती मागील ४ वर्षांपासून नैराश्यात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT