बाई, बाई; बिग बॉस रितेशने निक्कीला घडवली अद्दल  Bigg Boss Marathi
मनोरंजन

Bigg Boss Marathi: बाई, बाई; बिग बॉस रितेशने निक्कीला घडवली अद्दल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी ५' सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रत्येक शोत स्पर्धकांची भांडणं, ग्रॉसिप आणि वेगवेगळे टास्क पाहायला मिळत आहेत. निक्की तांबोळी, जान्हवी, अरबाज, सुरज चव्हाण आणि वैभव यांनी बिग बॉस मराठीच्या घरात भांडताना दिसतात. याचदरम्यान निक्की ''मराठी माणसाची मानसिकता अशी असते म्हणून मी येथे येणार नव्हते असं म्हणते''. या विधानानंतर तिच्यावर होस्ट आणि मराठी अभिनेता रितेश देशमुखने जोरदार भडकत तिला चांगलीच अद्दल घडविली.

भांडणादरम्यान 'तुम्हचं जे काही चालू आहे ते कितपत महाराष्ट्रातील लोंकांना पडतंय?, हे त्यांना दिसू दे ना?, संस्कृती न पाळणारी मुलगी, मराठी लोकांना हे सर्व दिसतेय.' असं स्पर्धक एकमेंकांना म्हणतात. याच दरम्यान निक्की म्हणतं की, 'म्हणूनच मराठी माणसाची मानसिकता अशी असल्याने या शोत मी येत नव्हते.' यानंतर मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य केल्याने होस्ट रितेश देशमुख निक्किवर भडकला. यानंतर निक्कीला सर्व जनतेची माफीही मागावी लागली आहे.

रितेशने निक्कीला घडवली अद्दल

रितेश देशमुख म्हणतो की, ''निक्की तुम्ही येथे मराठी माणसाची मानसिकता काढून त्याचा अपमान केलाय. आता त्याची माफी मागायला हवी. या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला स्थान नाही, महाराष्ट्रातील माणूस ठरवतो कोण राहणार आणि कोण जाणार?'' असेही तो म्हणतो. यानंतर निक्कि रडायला लागली आणि तिने लगेच हात जोडून सर्वाची माफीही मागितली. अशी अद्दल रितेशने निक्कीला घडविली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT