shahrukha khans mannat having illeagal construction?
एका सामाजिक कार्यकर्त्याने शाहरुखच्या मन्नतवर अवैध बांधकाम केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरुन BMC आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम शाहरुखच्या बंगल्यावर दाखल झाली. या तक्रारीवरुन संबधित अधिकाऱ्यानी तपासणी केली आहे.
मन्नतमधील काही भागाचे सध्या रिनोव्हेशन सुरू आहे. त्यामुळे शाहरुख त्याच्या कुटुंबासह पाली हिल येथील निवासस्थानी गेला आहे. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची आणि शाहरुखची भेट होऊ शकली नाही. निवासस्थानावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी रिनोव्हेशन संबंधित कागदपत्रे लवकरच सादर करण्याचे सांगितले.
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी कोणत्याही अवैध बांधकामाचा इन्कार केला आहे. ती टाइम्सशी बोलताना म्हणते की, अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. सर्व बांधकाम ही नियमाप्रमाणेच केले जात आहे.
वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रिनोव्हेशनच्या परवानगीबाबत तक्रार मिळाल्याने एका पथकाने संबंधित जागेची तपासणी केली आहे. या संबंधी अहवाल लवकरच सादर केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मन्नतवरील बांधकामासंदर्भात तक्रार दाखल केली होती. माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी सांगितले की मन्नतही यापूर्वी हेरिटेज बिल्डिंग होती. 2002 मध्ये त्यावर सात मजली अॅनेक्स बांधण्यात आला होता. शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याला वळसा घालण्यासाठी 12 लहान फ्लॅट्सना मंजूरी देण्यात आली. पण नंतर हे फ्लॅट्स एका आलीशान निवासस्थानात बदलण्यात आले. यावेळी शाहरुखने महापालिकेशी संगनमत केल्याचा आरोप सिंगनी केला होता.
मन्नतमध्ये सध्या शाहरुख आणि पत्नी गौरी यांच्यासह आर्यन, सुहाना आणि अबराम हे राहतात. रिनोव्हेशनमुळे हे राहत असलेले अपार्टमेंट वाशु भगनानी यांच्या मालकीचे आहे.