Ileana D'cruz welcome baby boy Instagram
मनोरंजन

Ileana D'cruz | इलियाना दुसऱ्यांदा झाली आई; बाळाचा क्यूट फोटोही शेयर, नावदेखील जाहीर

Ileana D'cruz welcome baby boy | इलियाना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने बाळाचा क्यूट फोटो शेयर केला आहे.

स्वालिया न. शिकलगार

Ileana D'cruz welcome baby boy

मुंबई - इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि तिचा पती मायकेल डोलन यांनी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. शनिवारी, इलियानाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

तिने १३ मे, २०२३ रोजी लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड मायकल डोलनशी सीक्रेट लग्न केले होते.

दुसऱ्यांदा दिला बाळाला जन्म

ही अभिनेत्री दुसऱ्यांदा मुलाची आई बनली आहे. त्यांनी बाळाचे नाव आणि मोनोक्रोम फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इलियानाने १९ जून २०२५ रोजी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. फोटोमध्ये त्यांचे नवजात बाळ खूप गोंडस दिसत आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'कीनू राफे डोलन' ठेवले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले - 'आमचे हृदय भरून आले आहे.'

२००३ मध्ये ती पहिल्यांदा आई झाली होती. त्यांनी ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर लगेचच, प्रियांका चोप्राने त्यांचे अभिनंदन केले! प्रियांका आणि इलियाना यांनी अनुराग बसूच्या २०१२ मध्ये आलेल्या 'बर्फी' चित्रपटात एकत्र काम केले आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

नुकतीच आई झालेली अथिया शेट्टीनेही या फोटोवर कॉमेंट केली. तिने लिहिले - 'अभिनंदन माझ्या इलु.'

'रुस्तम', 'बर्फी', 'मैं तेरा हिरो' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली आहे. ती आता क्वचितच चित्रपटांमध्ये दिसते. इलियाना २०२४ मध्ये एक रोमँटिक कॉमेडी दो और दो प्यार मध्ये दिसली होती. चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी, सेंथिल राममूर्ति यांच्या भूमिका होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT