ikkis box office collection agastya nanda film shows strong start on opening day
मुंबई : पुढारी ऑनलाईन
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण किती कमाई केली.
सन 2026 च्या सुरुवातीला प्रेक्षकांना चित्रपटगृहात अनेक मोठे बहुप्रतिक्षित चित्रपट पाहायला मिळत आहेत. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांची झलक मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक झाले. तसेच दिवंगत अभिनेत्याचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसले. विशेष म्हणजे रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ या चित्रपटाची घोडदौड सुरू असताना ‘इक्कीस’ चित्रपटाने त्याला कडवी टक्कर दिली.
आता जाणून घेऊया की, अमिताभ बच्चन यांचा नातू असलेल्या या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अगस्त्य नंदाच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळवला.
‘इक्कीस’ हा चित्रपट आधी 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा विचार होता. मात्र, अनेक चित्रपटांशी होणारी टक्कर टाळण्यासाठी हा चित्रपट जानेवारी 2026 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. नववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाल्याचा फायदा या चित्रपटाच्या कमाईला मिळाल्याचे दिसून येते.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत मोठा गाजावाजा केला.
श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘इक्कीस’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने, प्रेक्षकांना त्यांच्याशी भावनिक नाते जोडल्याचे पाहायला मिळाले.
या चित्रपटाने ओपनिंग डे ला चांगली कामगिरी केली. मात्र, पहिल्या दिवसाची कमाई फार जास्त असल्याचे सांगता येणार नाही. तरीसुद्धा, ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या दबदब्यामध्येही ‘इक्कीस’ने जी कमाई केली, ती कमी लेखण्यासारखी नक्कीच नाही.
‘इक्कीस’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई
अगस्त्य नंदा स्टारर ‘इक्कीस’ या चित्रपटासाठी पहिला दिवस यशस्वी ठरला. सॅक्निल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने ओपनिंग डे ला सुमारे ७ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले. अनेक प्रेक्षकांसाठी धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर अखेरची झलक पाहणे भावनिक ठरले.
मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुढील दिवसांत किती कमाई करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.