Sholay Original Climax public after 50 years
मुंबई - हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. गब्बर सिंग, ठाकूर, बसंती आणि सर्वात महत्त्वाचे जय-वीरू हे पात्रे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत एक गुपित अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये चर्चेत होतं - त्याचा मूळ क्लायमॅक्स. इतक्या वर्षानंतर आता पहिल्यांदाच ‘शोले’चा ओरिजिनल एंड प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे.
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ सिडनी मध्ये शोलेचा खरा शेवट रिलीज करण्यात येणार आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ सिडनी (IFFS) ने ही घोषणा केली आहे की, शोले या ऑक्टोबरमध्ये फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षक चित्रपट असेल हे फेस्टिव्हल ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहिल.
जेव्हा रमेश सिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, तेव्हा चित्रपटाचा शेवट असा व्हावा हा विचार करण्यात आला होता-खलनायक गब्बर सिंहचा मृत्यू ठाकुरच्या हातांनी व्हावा, म्हणजे ठाकुर आपल्या परिवाराचा बदला घेऊ शकेल. पण वितरकांच्या सल्ल्यानंतर क्लायमॅक्स बदलण्यात आला आणि चित्रपटात दाखवण्यात आले की, गब्बरला पोलिस अटक करते. पण, रमेश सिप्पी यांनी एंडिंगचे दोन व्हर्जन शूट केले होते जे आता पहिल्यांदा रिलीज होईल.
चित्रपटाच्या डिलीट केलेल्या सीन्समध्ये गब्बर सिंह अहमदला मारतो. पण, हे फारच क्रूर दृश्ये असल्याने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने हा सीन हटवला. शोलेमध्ये गब्बरच्या भूमिकेत अभिनेते अमजद खान तर अहमदच्या भूमिकेत सचिन पिळगावकर होते.