NTR Hrithik Roshan War 2 dubbing starts
मुंबई - 2025 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या वॉर 2 साठी सुपरस्टार एनटीआरने डबिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो स्टुडिओत डबिंग करताना दिसतो आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्स फ्रँचायजी चा सहावा भाग आहे, ज्याने आजवर केवळ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
या चित्रपटात एनटीआर सोबत असतील ऋतिक रोशन आणि कियारा अडवाणी. वॉर 2 मध्ये भरपूर अॅक्शन, धडकी भरवणारे स्टंट्स आणि तीव्र संघर्ष असेल, जिथे एनटीआर आणि ऋतिक एकमेकांशी जबरदस्त टक्कर देताना दिसतील.
वॉर 2 हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
video- Young__Tiger x account वरून साभार