हृषिकेश शेलारने मालिकेतील कुस्तीचे अनुभव सांगितले  Tula Shikvin Changlach Dhada Instagram
मनोरंजन

लहानपणी कुस्तीमध्ये २१ रु.चे बक्षीस मिळाले- हृषिकेश शेलार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये हल्लीच कुस्तीचा एक सीन दाखवला गेला. भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला १० दिवसांचे आव्हान दिले होते. घराबाहेर राहून दोघांना सिद्ध करून दाखवायचे होते की, ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत. अधिपती-अक्षराच्या ह्या कसोटीत खूप आव्हान ही येतात जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात, भुवनेश्वरी अक्षरा अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात त्या काकांना दोघांकडून घराचं १० हजार भाडं वसूल करायला लावते. पण सगळी आव्हाने पूर्ण करुन ते दोघे घरी येतात. घरात सगळे त्यांचं गोड कौतुक, स्वागत करतात.

हृषिकेश शेलारने तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील कुस्तीचे अनुभव सांगितले

कुस्तीचे अनुभव सांगितले हृषिकेश शेलारने...

कुस्तीच्या सीनसाठी केलेली मेहनत आणि त्याचा अनुभवाबाबत हृषिकेश शेलारने सांगितले, "कुस्तीचा अनुभव खूप छान होता. सलग ३ दिवस शूट करत होतो थकलो होतो तरी ही जेव्हा तो सीन शूट करून झाल्यावर छान वाटलं. मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे, ह्याची पुन्हा आठवण करून दिली ह्या सीनने. मला आनंद आहेत की, मी यशस्वीपणाने कुस्ती सीन करू शकलो. मला फारसं कुस्तीच ज्ञान नाही पण एकदा लहानपाणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो आणि त्यात मला २१ रुपयांचे बक्षीस मिळाले होते.

हृषिकेश शेलारने सेटवरही कुस्तीचे डावपेच शिकले

कुस्तीचे डाव किंवा तालिमीत मी शिकलो नाही. मी व्यायाम नियमितपणे अनेक वर्ष करत आहे मग ते घरी असो, किंवा व्यायामशाळेत. व्यायामाची मला आवड आहे आणि त्याचा मला इथे फायदा झाला आहे. सीनसाठी सेटवर जे तालमीतले लोक आले होते, मी त्याच्याकडून काही डाव शिकलो आणि मी सीनमध्ये तिथल्यातिथेच त्याचा वापर करायचो. माझा एकदा अपघातात पायाचा लिगामेंट फाटले होते. काही वर्षांपूर्वी तर त्याची काळजी घ्यावी लागत होती. हा सीन करण्यासाठी फक्त माझी एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीममुळे हा सीन अजून उत्तमपणे झाला."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT