स्त्री 2' चा ट्रेलर लॉन्च Pudhari Photo
मनोरंजन

Stree 2 Trailer Launch : 'सरकटे'च्या दहशतीपासून कसे वाचणार 'विक्की भैया'; बहुप्रतिक्षित 'स्त्री 2'चा ट्रेलर रिलीज

श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी अभिनीत स्त्री 2' चा ट्रेलर लॉन्च

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2018 मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भुमिका असलेला 'स्त्री' हा एक सरप्राईज हिट ठरला होता. ज्याने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. ह्या चित्रपटाने हॉरर आणि कॉमेडीचा समतोल साधत होता, तो हिंदी चित्रपटांसाठी महत्त्वाचा ठरला. आता लवकरच याचा दुसरा भाग म्हणजेच 'स्री 2' लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. याचा बहुप्रतिक्षित ट्रेलर गुरुवारी (दि.18) रिलीज झाला आहे.

'स्री' घाबरणार की हसवणार?

'स्त्री'च्या शेवटी, तुम्ही पाहिले असेल की, श्रद्धाचे पात्र प्रीतच्या चिरलेल्या वेणीसह निघून जाते, ज्यामध्ये काही वेगळ्या शक्ती आहेत. विकी आणि टोळक्याने मिळून त्या महिलेचा पाठलाग केला, पण चंदेरी पुराणात असं लिहिलं आहे की ती महिला निघून जाताच एक नवीन भूत येणार आहे. या नवीन भुताचे नाव सरकटा आहे. याच भूतामुळे महिलेची दहशत सुरू झाली होती.

'स्त्री 2' या दिवशी प्रदर्शित होणार आहे

स्त्री 2'चे दिग्दर्शक अमर कौशिक आहेत, ज्यांनी या फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त 'बाला' आणि 'भेडिया'चे दिग्दर्शनही केले आहे. ट्रेलरमध्ये असे दिसून येते की यावेळी अमरने पुन्हा एक जोरदार वातावरण तयार केले आहे. या कथेत हॉरर-कॉमेडीचा समतोल राखण्यासोबतच जबरदस्त सरप्राईजही मिळणार आहेत. वरुण धवनच्या 'भेडिया' पात्राचे कॅमिओ आणि भयपट विश्वातील इतर पात्रे देखील कथा अधिक मनोरंजक बनवणार आहेत. 'स्त्री 2' येत्या 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

पहा 'स्री 2' चा धमाकेदार ट्रेलर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT