Housefull 5 Box Office Collection Day 2
मुंबई - सुरुवातीला कासव गतीने जाणारा चित्रपट 'हाऊसफुल ५' ला आता समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाल्यानंतर शनिवारी 'हाऊसफुल ५' चे कमाईचे आकडे समोर आले आहेत. ईदच्या सुट्टी दिनी चित्रपटाला चांगला फायदा झाला.
या चित्रपटात बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'हाऊसफुल ५' चित्रपट ६ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.
'हाऊसफुल ५' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बऱ्यापैकी ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी, ईदची सुट्टी आणि वीकेंडचा फायदा मिळाला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'हाऊसफुल ५' ने पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 'हाऊसफुल ५' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३० कोटी रुपये कलेक्शन केले. आता हे एकूण कलेक्शन ५४ कोटी रुपये झाले आहे. आज संपूर्ण दिवस कमाईतत आणखी वाढ होईल.
'हाऊसफुल ५' मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन व्यतिरिक्त संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चित्रांगदा सिंग, दिनो मोरिया आणि नर्गिस फाखरी हे कलाकार आहेत.