Hina Khan Rocky Jaiswal Birthday Television News
मुंबई - टीव्ही अभिनेत्री ३ ऑक्टोबरला ३८ वर्षांची झाली. तिच्यासाठी कालचा दिवस खूपच खास राहिला. तिच्या पतीने रॉकी जायसवालने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रॉकीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी काही सुंदर क्षणांचे फोटोदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले.
टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. तिला कॅन्सरचे निदान झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती. मात्र या कठीण प्रसंगात तिचा पती आणि दीर्घकाळाचा साथीदार रॉकी जायसवाल सतत तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. आता त्याने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भावनिक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रॉकीने आपल्या पोस्टमध्ये हिना खानला आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. आपल्या पत्नीबद्दलचं अपार प्रेम, कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे. तिच्यामुळेच आयुष्यात प्रेम, आदर, आनंद, शांतता आणि खऱ्या सहवासाचा अर्थ कळला असल्याचं सांगत तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटलंय की, तिच्या विना तो अपूर्ण आहे. पोस्टमध्ये रॉकीने हेदेखील सांगितले की, हिना केवळ त्याची पत्नी नाही तर सोलमेट आणि चांगली मैत्रीण आहे.
रॉकीने कॅप्शनमध्ये लिहिलंय- आनंद, प्रेम, आदर, एकत्रता, सहवास, आनंद, आनंद, उबदारपणा, हास्य, शांतता, शांती आणि भागीदारी म्हणजे काय हे मला माहित होते. मी तुला शोधल्यानंतरच ते अनुभवले! तू माझ्यासाठी जीवन आहेस, तू माझ्यासाठी जीवनापेक्षा महत्त्वाची आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये. माझ्या पत्नीला परतीच्या अनेक शुभेच्छा. मी तुझ्यावर प्रेम करतो.
फॅन्सना रॉकीचा हा अंदाज खूप आवडला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे बॉन्डिंगचे खूप कौतुक करताना फॅन्स थकत नाहीत.
हिना आणि रॉकी यांची लव्ह स्टोरीची सुरुवात टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या सेटवर झाली. हिनाने अक्षराची भूमिका साकारली होती. त्यावेळी रॉकी प्रोड्यूसर होता. जवळपास दोघांनी १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जूनमध्ये विवाह केला.