भारतीय सिनेमाच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे हेराफेरी. कॉमेडी सिनेमांच्या यादी काढली तर हेराफेरीचे नाव विसरून चालणार नाही. बाबुराव आपटे, राजू, श्याम या त्रिकूटाने भारतीय सिनेरसिकांना भरभरून हसवले आहे. अगदी अलिकडेपर्यंत या सिनेमातील डायलॉग्सवर मीम्स बनत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हा सिनेमा म्हणजे एका सिनेमाची कट टू कट कॉपी असल्याचे खुद्द दिग्दर्शकानेच सांगितले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अलीकडेच एका मुलाखती दरम्यान ही बाब उघड केली. (Latest Entertainment News)
प्रियदर्शन या सिनेमाबाबत बोलताना पुढे म्हणतात, की जेव्हा कधी ते रिमेक बनवतात त्यावेळी ते कलाकारांना तो ओरिजिनल सिनेमा दाखवत नाहीत. त्यांना असे वाटते की प्रत्येक कलाकाराची बॉडी लँग्वेज वेगळी असते. त्यामुळे रिमेकमधील प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:च्या अंगाने फुलायला वाव मिळतो.
पण या सगळ्यामध्ये त्यांनी हे देखील शेयर केले की एक सिनेमा असाही आहे की जो त्यांनी पूर्णपणे कॉपी केला होता. ते स्पष्ट म्हणाले की, ‘ मी कधी कोणत्या सिनेमाला फ्रेम टू फ्रेम कॉपी केले नाही. पण हेराफेरी याला अपवाद आहे. त्याचे सगळे डायलॉगदेखील कॉपी केले गेले होते. ते हिन्दीमध्ये भाषांतरित करून हा सिनेमा रिलीज केला गेला होता.
हेराफेरी हा मल्याळी सिनेमा रामजी राव स्पीकिंगचा रिमेक होता.
रामजी राव स्पीकिंगमध्ये कुणाच्या भूमिका होत्या?
या सिनेमात विजय राघवन हे मुख्य भूमिकेत होते. याशिवाय साई कुमार, मुकेश हे मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा 1989 मध्ये रिलीज झाला होता.
या सिनेमातून बाबूभैय्याची व्यक्तिरेखा साकारणारे परेश रावल या सिनेमातून काही कारणास्तव बाहेर पडले होते. पण मेकर्सच्यात आणि त्यांच्यात समेट झाला असून आता ते या सिनेमात दिसणार असल्याचे समोर आले आहे.