माहिका शर्माच्या हातातील हिऱ्याची अंगठी दिसणाऱ्या फोटोमुळे हार्दिक पांड्या आणि तिच्या कथित साखरपुड्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र दोघांकडूनही कोणतीही पुष्टी किंवा अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मुंबई - भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल माहिका शर्मा यांनी अलिकडच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिकाच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांना उधाण आले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी फोटो शेअर केले शिवाय एकत्र प्रार्थना देखील केली. त्यांनी प्रेमाचे क्षण देखील शेअर केले, ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा उघडपणे सुरु झाली आहे.
नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड सोबत साखरुडा केल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी शेएर केलेल्या फोटोंमध्ये माहिकाच्या हातात डायमंड रिंग पाहून फॅन्स कयास लावत आहेत की, त्यांनी साखरपुडा केला आहे. कारण दोघांनी मंदिरात जाऊन एकत्र दर्शनदेखील घेतले आहे आणि त्याचे फोटो व्हायरल होताना दिसताहेत.
या लव्हबर्डने सोशल मीडियावर एका मागोमाग एक फोटो शेअर केले. ज्यामध्ये माहिकाच्या हातात एक चमचमती अंगठी दिसली. हार्दिक नुकताच आपला मुलगा अगस्त्य आणि पेट डॉगसोबत दिसला होता. त्याने काही फोटोज देखील शेअर केले होते. एका खास फोटोंमध्ये दोघे पूजा-प्रार्थना करताना दिसले. तर काही फोटोंमध्ये माहिका अंगठी फ्लॉन्ट करताना दिसली.
यानंतर सोशल मीडिया युजर्सनी तत्काळ कयास लावला की, त्यांनी साखरपुडा केला आहे. फोटोंमध्ये दोघे पारंपरिक ड्रेसमध्ये दिसताहेत. आणखी एका फोटो मध्ये हार्दिक माहिकाच्या गालावर किस करताना दिसत आहे.
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा १० ऑक्टोबर, २०२५ रोजी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. हार्दिकने आपल्या बर्थडेला लेडी लव्ह सोबत फोटो शेअर करून माहिका सोबत आपले नाते ऑफिशियल कन्फर्म केले होते. सेलिब्रेशनसाठी ते बीच व्हेकेशनवर गेले होते.