हार्दिक-जस्मिन एकत्र व्हेकेशनला गेल्याची चर्चा रंगली आहे Instagram
मनोरंजन

Hardik-Jasmin Walia Dating : जस्मिन वालियाला डेट करतोय हार्दिक पांड्या? (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नताशा स्टेनकोविकनंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या जस्मिन वालियासोबत डेटिंग करत असल्याची चर्चा रंगली आहे. जस्मिन इतकी बोल्ड आहे की, तिचे इन्स्टा अकाऊंट पाहिल्यास सर्वाधिक हॉट फोटो पाहायला मिळतात. रिपोर्टनुसार, हार्दिक जस्मिनसोबत वेकेशनवर गेल्याचे म्हटले जात आहे. (Hardik-Jasmin Walia Dating)

जस्मिन वालिया-हार्दिक पांड्या ग्रीसमध्ये?

हार्दिक पांड्या नताशा स्टेनकोविकशी घटस्फोटामुळे चर्चेत होता. त्यानंतर तो अनन्या पांडेला डेट करत असल्याचे वृत्त समोर आले. आता हार्दिक जस्मिन वालिया सोबत आहे. असे म्हटले जात आहे की, हार्दिक आता जस्मिनला डेट करत आहे. दोघेही वेकेशनसाठी एकत्र ग्रीसमध्ये गेले आहेत.

कोण आहे जस्मिन वालिया?

जस्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आणि अभिनेत्री आहे. ती एक टीव्ही पर्सनॅलिटी आहे. म्युझिक इंडस्ट्री ते सोशल मीडियापर्यंत तिची चर्चा आहे. लंडनच्या एस्सेक्समध्ये जन्मलेल्या जस्मिनचे आई-वडील मूळ भारतीय आहेत. जस्मिनने जगाचे सर्वात पहिल्यांदा लक्ष वेधलं ते म्हणजे, ब्रिटिश रिॲलिटी टीव्ही सीरीज The Only Way Is Essex मुळे.

कार्तिक आर्यनच्या चित्रपटासाठी गायले गाणे

जस्मिनने या शोनंतर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. २०१४ मध्ये तिने आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च केलं. चॅनेलवर जस्मिन दुसरे गाणे गाऊन आपले टॅलेंट दाखवायची. तिने जॅक नाईट, इन्टेंस-टी आणि ग्रीन म्युजिकसोबत काम केलं. 'बॉड डिगी'च्या माध्यमातून २०१७ मध्ये तिला मोठा ब्रेक मिळाला. जस्मिनने पहिल्यांदा जॅक नाईट सोबत परफॉर्म केलं. त्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. २०१८ मध्ये बॉलीवूड चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' साठी तिने 'बॉम डिगी डिगी' सॉन्गचे रिमेक देखील केले.

जस्मिनचा बिग बॉस १३ विनरसोबत व्हिडिओ

२०२२ मध्ये जस्मिन वालियाने बिग बॉस १३ चा फायनलिस्ट आसिम रियाजसोबत Nights n Fights नावाच्या म्युजिक व्हिडिओ केला. तिची ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली. या व्हिडिओला इंटरनॅशनल अटेंशन मिळालं. टाईम्स स्क्वेयर बिलबोर्डवर देखील स्थान मिळाले. जस्मिन सोशल मीडिया सेंसेशन आहे आणि फक्त इन्स्टाग्रामवर त्याचे ६.४ लाख फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर ५.७ लाख सब्सक्राईबर्स आहेत. ती नेहमी बोल्ड आणि सेंसेशनल फोटो पोस्ट करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT