मुंबई - एक असे मुस्लिम महिलेचे प्रकरण ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. कायदा आणि समाज दोन्हीही बाबींना टक्कर देणाऱ्या, लाखो महिलांचे आयुष्यच बदलले. हक ट्रेलरमधून मुख्य अभिनेता इमरान हाशमी यासंदर्भातच आवाहन करताना दिसत आहे. अभिनेत्री यामी गौतम आणि इमरान हाशमी यांच्या हक चित्रपटाचा ट्रेलर रात्री उशीरा रिलीज करण्यात आला.
दिग्दर्शक सुपर्णा एस वर्मा यांचा हा सोशल ड्रामा ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार
हा सोशल ड्रामा ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. समाज आणि कायद्याच्या चौकटीत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका मुस्लिम महिलेच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे.
दिग्दर्शिका सुपर्णा एस. वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘हक’ हा एक सामाजिक आणि भावनिक ड्रामा असून, तो सत्यघटनेवर आधारित असल्याचं सांगितलं जातं. ट्रेलरमध्ये इमरान हाशमी एका कायदेपंडिताच्या भूमिकेत दिसतो जो एका महिलेसाठी संपूर्ण समाज आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देतो. यामी गौतम एका निडर, पण भावनिक महिलेची भूमिका साकारताना दिसते जी आपल्या ‘हक’साठी म्हणजेच अधिकारांसाठी लढते.
८० च्या दशकातील ऐतिहासिक ‘मोहम्मद अहमद खान वर्सेस शाहबानो बेगम’ प्रकरणावर आधारित चित्रपट ‘हक’चे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात इमरान हाशमी हा मोहम्मद अहमद खान आणि यामी गौतम अभिनेत्री शाहबानो बेगम यांची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतम पडद्यावर अशी कहाणी दाखवणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.