Ajay Devgn: एकेकाळी 'कितीही प्यायलो तरी चढत नाही' अशी बढाई मारणारा अजय देवगण आता म्हणतो...'
Ajay Devgn drinking habits:
नवी दिल्ली : बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण याने अलीकडेच कार्टेल ब्रदर्सच्या सहकार्याने द ग्लेनजर्नीज हा एक लक्झरी सिंगल माल्ट व्हिस्की ब्रँड लाँच केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की देवगण एकेकाळी खुप मद्यपान करत होता? नुकतेच त्याने दारू पिण्याची सवय आणि त्यात बदल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मोकळेपणाने सांगितले.
अजय देवगण म्हणाला, “पूर्वी खूप पित होतो…”
एका मुलाखतीत अजयने दारूचे सेवन कमी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल सांगितले. तो म्हणाला, "मी काय करतो हे मी लपवत नाही, खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी खूप दारू प्यायचो. पण आता मी फक्त एक-दोन ग्लास मॉल्ट घेतो, तेही प्रत्येकी ३० मिली.” त्याने सांगितलं की हा त्याच्या जीवनशैलीतील मोठा बदल होता.
त्याने सांगितले की एका वेलनेस स्पा मध्ये गेल्यानंतर एक महिना दारू न पिण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू त्याने आपल्या आवडी आणि सवयी बदलल्या. तो म्हणाला, "मी एका वेलनेस स्पा मध्ये गेलो आणि मी दारू पिणे सोडले. आता माझं जीवन अधिक संतुलित आणि निरोगी वाटतं,” असं त्याने सांगितलं.
आता घेतो ६० हजार रुपयांची ‘लिमिटेड एडिशन मॉल्ट’
याच मुलाखतीत अजय देवगणने सांगितले की आता तो प्रीमियम लिमिटेड एडिशन मॉल्ट घेतो, ज्याची किंमत अंदाजे ६०,००० रूपये आहे. "आता हे माझ्यासाठी दारू पिण्यासारखे नाही. हा एक नियमित दिनक्रम आहे, जो आराम देतो. जेवणासोबत फक्त ३० मिली, कधी कधी दोन ग्लास, पण त्यापलीकडे कधीच गेलो नाही,” असं तो म्हणाला.
“कितीही प्यायलो तरी चढत नाही”
दरम्यान, यापूर्वी 'द रणवीर शो' वर देवगणने सांगितले होते की तो एका वेळी कितीही प्यायला तरी त्याला नशा चढत नाही. दारू कोणी प्यावी याबद्दलही अभिनेत्याने आपले मत व्यक्त केले होते. तो म्हणाला की, जर कोणी दारू पीत असेल तर त्याने ती प्यायल्यानंतर तिचा आनंद घेतला पाहिजे, अन्यथा त्याने पिऊ नये.

