यामी गौतम आणि इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला 'हक' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. देशातील महत्त्वाच्या खटल्यावर बेतलेला हा कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. समीक्षकांनीही या सिनेमाचे कौतुक केले आहे. या सगळ्यांमध्ये एक व्हीडियो समोर येतो आहे जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला. सिनेमा संपल्यानंतर एक मुस्लिम महिला यामी जवळ आली. यानंतर ती यामीच्या जवळ येऊन तिला मिठी मारून ढसाढसा रडू लागली. (Latest Entertainment News)
एका पॅपाराझी पेजवर हा व्हीडियो व्हायरल होतो आहे. यामध्ये यामी आणि इम्रान सिनेमा पाहिल्यानंतर फॅन्सशी संवाद साधू लागले. यादरम्यान एक मुस्लिम महिला यामी जवळ आली.
ती यामीला म्हणाली, खूप आनंद झाला आहे. पाहून मला वाटले की हा हक्क आम्हाला मिळायला हवा. हे माझ्यासाठीही आहे की मी देखील असा लढा देऊ शकतो. मला खूप शिकायला मिळाले.’ आणखी एका व्हीडियोमध्ये महिलेने यामीला मिठीही मारली.
हा सिनेमा देशातील शाहबानो खटल्यावर बेतला आहे. हा खटला देशातील बहुचर्चित खटल्यांपैकी एक समजला जातो. या सिनेमात यामी गौतम शाहबानोच्या भूमिकेत दिसते आहे. तर इम्रान हाश्मी मोहम्मद अहमद खान म्हणजेच शाहबानोच्या पतीच्या भूमिकेत दिसतो आहे. एप्रिल 1978 ला इंदौरला एक खटला दाखल झाला होता.
शाहबानो ने आपला घटस्फोटीत नवरा मोहम्मद अहमद खानने पोटगीसाठी अर्ज केला होता.या दोघांना पाच मुले आहेत. खटला दाखल झाला तेव्हा शाहबानोचे वय 59 होते. त्यावेळी कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉं बोर्डाच्या आदेशाला धुडकावून लावत शाहबानोचा पोटगीचा अर्ज मंजूर केला होता.