Prabhas new movie poster launch
मुंबई - साऊथ सुपरस्टार प्रभासचा आज २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. हा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. अभिनेता प्रभास फौजीच्या भूमिकेत खतरनाक लूकमध्ये दिसत आहे.
निर्मात्यांनी प्रभासच्या आगामी चित्रपट ‘फौजी’चे एक खास पोस्टर रिलीज करत चाहत्यांना अप्रतिम गिफ्ट दिलं आहे. या नव्या पोस्टरमध्ये प्रभास एकदम वेगळ्या आणि खतरनाक अवतारात दिसत आहे. डोळ्यात तीव्र नजर अशा दमदार लूकमुळे पोस्टर सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाले आहे.
हा चित्रपट हनु राघवपुडी दिग्दर्शित करत आहेत. प्रभास मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर प्रभासच्या वाढदिनी शेअर केला आहे आणि फॅन्ससाठी मोठं सरप्राईज दिलं आहे. पोस्टर शेअर करतने लिहिलं- 'प्रभास आणि हनुची फौजी...एका धाडसी जवानाची कहाणी...हॅप्पी बर्थडे रेबल स्टार प्रभास.'
‘फौजी’ हा प्रभासचा पुढील मोठा ॲक्शन थ्रिलर प्रोजेक्ट असल्याचं बोललं जात आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस नेहमीच खास असतो. ‘बाहुबली’, ‘सालार’, ‘आदिपुरुष’ आणि ‘प्रोजेक्ट के’नंतर आता ‘फौजी’कडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. सोशल मीडियावर फॅन्सनी लिहिलं आहे – “द नेक्स्ट ब्लॉकबस्टर इज लोडिंग!”, “प्रभास इज बॅक विथ अ बॅंग!” अशा कमेंट्सने ट्विटर आणि इंस्टाग्राम भरून गेले आहेत.
सीता रमण नंतर दिग्दर्शक हनुचा हा पुढील चित्रपट आहे. हा आगामी आणखी एक बिग प्रोजेक्ट आहे. हे पोस्टर माइथ्री मूवी मेकर्सने शेअर केलाय. चित्रपटात प्रभास शिवाय मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा आणि अनुपम खेर यांच्या भूमिका असतील. रिपोर्ट्सनुसार, हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल.