मनोरंजन

HBD Mahesh Babu : श्रीमंतीचा असा थाट! महेश बाबूची संपत्ती आहे तरी किती?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपटांचा अभिनेता महेश बाबू आज वाढदिवस साजरा करत आहे. (HBD Mahesh Babu) चेन्नई येथे ४८ वर्षांपूर्वी या दिवशी त्याचा जन्म झाला होता. त्याने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत ठसा उमटवला. आज तो दक्षिण भारतातील सर्वात महागड्या स्टार्सच्या यादीत सामील झाला आहे. महेश बाबूने १९८३ मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. महेश बाबू आज कोटींच्या संपत्तीचा मालक आहेत. महेश बाबूने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला 'पोरतम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर महेश बाबूने १९९९ मध्ये रिलीज झालेल्या तेलुगू चित्रपट 'राजा कुमारुडू'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला. (HBD Mahesh Babu)

या चित्रपटात प्रिती झिंटा त्याच्यासोबत दिसली होती. त्यानंतर महेश बाबूने 'मुरारी' (२००१), 'बॉबी' (२००२), 'ओक्कडू' (२००३), 'अर्जुन' (२००४), 'पोकिरी' (२००६), 'बिझनेसमन' (२०१२), 'अगडू' हे चित्रपट केले. 'ब्रह्मोत्सवम' (2016), स्पायडर, भारत अने नेनू, महर्षी, सरिलेरू नीकेव्वरु यासह अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला.

महेश बाबूची संपत्ती :

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, महेश बाबूची ३० मिलियन डॉलर (२२२ कोटी रुपये) पेक्षा जास्त संपत्ती आहे. त्याची सर्वाधिक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. तो एका चित्रपटासाठी १८ ते २० कोटी रुपये घेतो. तो एका जाहिरातीसाठी कोट्यवधी फीदेखील घेतो.

महेश बाबूचा बंगला :

महेश बाबू खूप आलिशान जीवन जगतो. एवढेच नाही तर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये त्याचा एक आलिशान बंगलादेखील आहे. त्याची किंमत सुमारे ३० कोटी आहे. यासोबतच त्याने बंगळुरूमध्ये एक घरही विकत घेतले आहे, ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

कार कलेक्शन :

हेश बाबू लक्झरी कारचा चाहता आहे. त्याच्याकडे lamborghini gallardo आहे. ज्याची किंमत ३ कोटी रुपये आहे. यासोबतच २ कोटी रुपयांची range rover vogue, ९० लाखांची toyota land cruiser, ४९ लाख रुपयांची Mercedes-Benz E-Class आणि १.१२ कोटी रुपयांची Audi A8 आहे.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT