Hai Jawani Toh Ishq Hona Hai Collection Day 11: बॉलीवूड अभिनेता वरूण धवनचा है जवानी तो इश्क होना हैं हा चित्रपट कधी रिलीज होणार याची वाट चाहते पाहत होते. ही लव्ह ट्रँगल चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. वरूण धवनची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ५ जून रोजी रिलीज झाला. है जवानी तो इश्क होना हैं हा कॉमेडी चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलं आहे.
डेविड धवन एका खास धाटणीचे चित्रपट तयार करतात. त्यामुळं है जवानी तो इश्क होना है याबाबत प्रेक्षकांमध्ये खास आकर्षण होतं. वरूण धवनच्या या चित्रपटाने विकएन्डला चांगली कामगिरी केली. सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले असून चित्रपटाने छप्पर फाड के कमाई केली आहे.
वरूण धवनचा हा विनोदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. डेविड धवनचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात काही रिमिक्स गाणी देखील आहेत. या गाण्यांमुळं वाद देखील निर्माण झाला होता. मात्र तरी देखील चित्रपट चांगली कमाई करत आहे.
वरूणच्या अपोझिट राम चरणचा पेड्डी आणि कंगणा रनौतचा भारत भाग्य विधाता हे चित्रपट होते. त्यामुळं वरूण धवनच्या चित्रपटाला चागंली टक्कर निर्माण झाली होती. मात्र तरी देखील रिलीजपासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ओपनिंग दिवशी या चित्रपटाने ७.५० कोटी रूपये कमवले होते.
आता सोमवारच्या कलेक्शनचे आकडे समोर आले असून ११ दिवशी देखील या चित्रपटाने १.३५ कोटी रूपयांचा गल्ला कमावला आहे. है जवानी तो इश्क होना है ची आतापर्यंतची बॉक्स ऑफिस नेट कलेक्शन ४६.१५ कोटी रूपये झाले आहे. दुसरीकडे खासदार कंगना रनौतच्या भारत भाग्य विधाता चित्रपटाने सोमवारी फक्त ६५ लाख रूपयांची कमाई केली आहे.
वरूण धवनच्या है जवानी तो इश्क होगा हैं रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर देत आहे. राम चरण आणि जान्हवी कपूर यांचा पेड्डी, बॉबी देओलचा बंदर हे चित्रपट एकत्रच रिलीज झाले होते. त्यानंतर भारत भाग्य विधाता, दोसांज यांचा मैं वापस आऊंगा आणि हाँटेड उडी इकोज ऑफ द पास्ट देखील रिलीज झाले होते. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा निर्माण झाली होती.
वरूण धवनने है जवानी तो इश्क होना हैं या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले. चित्रपट चांगली कमाई करत आहे. फरहाद सामजी यांचे काही डायलॉग तर अफलातून आहेत. वरूण आपल्या कॉमिक पंच लाईनद्वारे चित्रपटाला चार चांद लावले आहेत. मृणाल ठाकूरने देखील या चित्रपटात काम केले असून पूजा हेगडे देखील भाव खावून गेली आहे.
मनीष पॉलने देखील आपल्या विनोदी अभिनयानं चित्रपटात जीव ओतला. नेहमीप्रमाणे जिमी शेरगीलने देखील दमदार अभिनय केला. राकेश बेदी देखील उठून दिसत आहेत. तसेच मौनी रॉय, चंकी पांडे आणि आयशा रजा मिश्रा ही स्टारकास्ट देखील या चित्रपटाला लाभली आहे.