Guru Randhawa Controversy Instagram
मनोरंजन

Guru Randhawa Controversy: गुरु रंधावाचे गाणे मिलियन व्ह्यूव्ज ट्रेंडवर; पण वादग्रस्त ठरले 'अजुल' गाणे

Guru Randhawa Controversy: गुरु रंधावाचे गाणे मिलियन व्ह्यूव्ज टॉपवर; पण वादग्रस्त ठरले 'अजुल' गाणे

स्वालिया न. शिकलगार

Guru Randhawa Azul song Controversy

मुंबई - आज ३० ऑगस्ट रोजी गायक गुरु रंधावाचा वाढदिवस आहे. पण त्याआधीच त्याला ट्रोल केलं जात आहे. कारण आहे-अजुल गाणे. सोशल मीडियावर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाय. त्याच्या रिलीज झालेल्या नव्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

गायक गुरु रंधावाचे ‘अजुल’ गाणे यू-ट्यूबवर ट्रेंड करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. या गाण्याच्या माध्यमातून शाळेच्या मुली सीनमध्ये दाखवण्यात आले आहेत.

१२ व्या क्रमांकावर ट्रेंड अजुल गाणे

गुरु रंधावाचे ‘अजुल’ गाणे ऑगस्ट महिन्यात रिलीज झाला आहे. गाणे रिलीज होऊन तीन आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. पण अद्याप म्युझिक ट्रेंडिंग चार्टमध्ये १२ व्या क्रमांकावर आपले स्थान निश्तित केलं आहे. १२ व्या क्रमांकावर हे गाणे असून ‘अजुल’ला यु-ट्यूबवर ४३ मिलियनहून अधिक व्ह्युव्ज आणि ७४ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

गाण्यात दारु (शराब) शब्दाचा उल्लेख

गुरु रंधावाचे गाणे ‘अजुल’मध्ये शाळेच्या विद्यार्थीनी दिसत आगत. त्यांच्यासोबत गायक देखील डान्स करताना दिसत आहे. शिवाय गाण्यात दारुचा उल्लेख देखील आहे. एकीकडे, ‘अजुल’ गाण्याला खूप प्रेम मिळालं तर दुसरीकडे लोकांचा आरोप आहे की, यामध्ये शाळेच्या मुलींना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे.

काय म्हणताहेत युजर्स?

'अजुल' गाण्याला ट्रोल करत एका यूजरने लिहिलं, 'अजुलमध्ये गायक शाळेच्या मुलींना पाहत असल्याचे दिसत आहे. जेव्हा लोकांनी ट्रोल करणं सुरू केलं, तर त्यांनी इन्स्टाग्रामचे कॉमेंट्स हाईड केले.' एका अन्य युजरने लिहिलं, ''गुरु रंधावाचे नवे गाणे घाणेरडे आहे. एक मोठा माणूस जो शाळेच्या मुलींकडे आकर्षित होतो. याला रोमँटिक गाणे बनवले?''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT