Gulshan Devaiah role in Kantara Chapter 1  Instagram
मनोरंजन

Kantara Chapter 1 | कोण आहे गुलशन देवैया? 'कांतारा चॅप्टर-१' मध्ये साकारणार 'ही' खास भूमिका

Kantara Chapter 1 Gulshan Devaiah | कोण आहे गुलशन देवैया? 'कांतारा चॅप्टर-१' मध्ये साकारणार 'ही' खास भूमिका

स्वालिया न. शिकलगार

Gulshan Devaiah role in Kantara Chapter 1

मुंबई - ऋषभ शेट्टी यांच्या 'कांतारा चॅप्‍टर १' मधील आणखी एका पात्राची घोषणा करण्यात आलीय. होम्‍ब्‍ले फिल्‍म्‍सने मंगळवारी चित्रपटातील कलाकारांपैकी गुलशन देवैयाचा फर्स्‍ट लूक रिलीज केला असून सोशल मीडियावर पोस्‍टर रिलीज करण्यात आले आहे.

गुलशन देवैया कोणती भूमिका साकारणार?

चित्रपटामध्ये गुलशन हे कुलशेखर हे पात्र साकारणार आहेत. 'कांतारा चैप्टर १' कन्‍नड भाषेत तयार होत असून यावर्षी गांधी जयंती दिनी चित्रपटगृहात रिलीज होईल. फर्स्ट लूकमध्ये पोस्‍टरमध्ये गुलशन देवैयाचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. पोस्‍टरमध्ये गुलशन शाही अंदाजात सिंहासनावर विराजमान आहे. माथ्यावर मुकूट आणि गल्यात सोने - रत्‍नांनी सजलेले हार आणि चेहऱ्यावर विशिष्ट भाव आहे. पौराण‍िक काळात राजा-महाराजांप्रमाणे त्यांचे लांब केस दिसत आहेत.

होम्‍ब्‍ले फिल्‍म्‍सने काय म्हटलं?

होम्‍ब्‍ले फिल्‍म्‍सने मंगळवारी गुलशन देवैयाचा फर्स्ट लूक पोस्‍टर शेअर करत लिहिलं, 'आम्ही कांतारा चॅप्टर १ च्या दुनियेतून गुलशन देवैयाला 'कुलशेखर'च्या रूपात सादर करतो.'

कोण आहे गुलशन देवैया?

अभिनेता गुलशन देवैयाचा जन्म बंगळुरुमध्ये २८ मे, १९७८ रोजी झाला होता. गुलशन यांनी शैतान, हंटर आणि हेट स्टोरीमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गुलशनने थिएटर देखील केले आहे. नाटक ग्रुपमध्ये तो लायटिंग देखील करत होते. आयुष्मान खुरानाच्या 'बधाई दो' मध्ये त्याने समलैंगिक भूमिका साकारली होती. केवळ १० मिनिटांच्या स्क्रीनटाईममध्ये ते प्रकाशझोतात आले.

तसेच वेब सीरीज 'दहाड'मध्ये त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारली होती. रणवीर -दीपिकाचा चित्रपट 'राम लीला' मध्ये देवैया यांनी भवानी ही भूमिका साकारली. 'कमांडो ३' मध्ये विद्युत जामवाल सोबत बुराक अंसारीच्या भूमिकेत होते. अजय देवगनच्या 'शैतान' चित्रपटातही त्याने अभिनय साकारला आहे. 'गन्स अँड गुलाब्स'मध्येही त्यांनी आत्माराम नावाची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT