मनोरंजन

ग्लोबलस्पा ॲवॉर्ड्स २०२३ : रेखा ते मानुषी छिल्लरने लावले चारचाँद

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबलस्पा ॲवॉर्ड्स २०२३ च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. ग्लोबलस्पा ॲवॉर्ड्स 2023 हा भारताच्या सौंदर्य आणि वेलनेस उद्योगातील लोकांच्या अनोख्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जाणारा अनोखा पुरस्कार आहे. बॉलीवूड, क्रीडा, फॅशन आणि संगीतातील नामवंत सेलिब्रिटींना सन्मान करण्यासाठी त्यांचं ग्लॅमर साजरा करणारा ग्लोबल स्पा पुरस्कार मोठ्या दिमाखात साजरा झाला.

संबंधित बातम्या – 

रेखा, शोभिता धुलिपाला, राशी खन्ना, मानुषी छिल्लर, वाणी कपूर, अपारशक्ती खुराना, राधिका मदन, सैयामी खेर, अंगद बेदी, मनीष मल्होत्रा, खान मल्होत्रा, अर पॉल, खान मनिषा, बी. मलिक, रणदीप हुडा आणि इतर अनेक बड्या कलाकारांच्या उपस्थितीत हा ॲवॉर्ड सोहळा संपन्न झाला. यावेळी कलाकारांनी त्यांच्या फॅशन आणि ग्लॅमरस लूकने रेड कार्पेटची शोभा वाढवली.

SCROLL FOR NEXT