अरमानी या जगप्रसिद्ध फॅशन ब्रॅंडचे सर्वेसर्वा जॉर्जिओ अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. जगभरात त्यांची ओळख फॅशन किंग म्हणून होती. इटालियन फॅशनमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे श्रेय त्यांना जाते. आपल्या मिलान येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Latest Entertainement News)
त्यांच्या निधानानंतर कंपनीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणले आहे की, ‘अतीव दुखाने आम्ही जाहीर करतो की आमचे संस्थापक आणि प्रेरणास्थान जॉर्जियो अरमानी यांचे निधन झाले आहे.’अरमानी शेवटपर्यंत कार्यरत होते.
त्यांनी अरमानीची सुरुवात फॅशन कंपनी म्हणून केली होती. पण त्यानंतर ते संगीत, खेळ, परफ्यूमस आणि हॉटेल्स क्षेत्रातही उतरले. दरवर्षी 2 बिलियन पाउंडपेक्षा जास्त अरमानीचा टर्नओव्हर होता. त्यांच्या संपत्तिमध्ये 200 फूटची आलीशान यॉट आणि इटलीचा प्रसिद्ध बास्केटबॉल क्लब ऑलिम्पिया मिलानो हा देखील होता. जगभरात 600 हून अधिक अरमानीचे स्टोअर्स आहेत.
जॉर्जिओ यांनी सेलिब्रिटींसाठी रेड कार्पेट फॅशनचा ट्रेंड सुरू केला. ब्रॅंड पिट, जॉर्ज क्लूनी, जूलिया रॉबर्ट, रसेल क्रो, लेडी गागा यासारखे सेलिब्रिटी यांचा लाडका ब्रॅंड म्हणून अरमानीची ओळख होती.
अरमानी यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे मागे सोडलेले बिझनेसचे एवढे मोठे साम्राज्य आता कोण सांभाळणार याची चर्चा बहुतेकजन करत आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारीची योजना यापूर्वीच बनवून ठेवली होती. आता त्यांच्या कंपनीची कमान त्यांचे विश्वासू सहकारी लियो डेल ओरको आणि कुटुंबाचे सदस्य सिल्वाना अरमानी हे सांभाळणार आहेत.