Smita Shewale entry in Gharoghari Matichya Chuli pudhari photo
मनोरंजन

Gharoghari Matichya Chuli Smita Shewale |जानकी विरुद्ध माया संघर्षात नवी ठिणगी! 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये मोठा ट्विस्ट, स्मिता येताच भल्याभल्यांची बोलती होणार बंद...

Courtroom drama Marathi tv serial- स्मिता शेवाळे येताच भल्याभल्यांची बोलती होणार बंद! 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा हाय-व्होल्टेज ड्रामा

स्वालिया न. शिकलगार

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये आता प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणदिवे कुटुंबातील सुनांनी मायाविरोधात लढा देण्याचे ठरवल्यानंतर आता हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आहे. या मालिकेत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे यांची एण्ट्री होत असून त्या 'गीतांजली सरंजामे' या निष्णात वकिलाची भूमिका साकारणार आहेत. गीतांजली ही मायाच्या बाजूने केस लढणार असून, जानकीची बाजू मांडणाऱ्या अवंतिकासोबत तिचा मोठा सामना रंगणार आहे. एकाही केसमध्ये पराभव न स्वीकारलेल्या गीतांजलीच्या येण्याने मालिकेच्या कथानकात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.

Gharoghari Matichya Chuli Smita Shewale entry

स्टार प्रवाह वाहिनीवरील कौटुंबिक मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) मध्ये सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणदिवे कुटुंबाच्या घरात दुफळी माजवणाऱ्या मायाचे खरे रूप आता सर्वांसमोर आले आहे. मात्र, माया सहजासहजी हार मानणारी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. या संघर्षाला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले असून, मालिकेत एका जबरदस्त 'कोर्टरूम ड्रामा'ला सुरुवात होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील कौटुंबिक मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) मध्ये सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणदिवे कुटुंबाच्या घरात दुफळी माजवणाऱ्या मायाचे खरे रूप आता सर्वांसमोर आले आहे. मात्र, माया सहजासहजी हार मानणारी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. या संघर्षाला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले असून, मालिकेत एका जबरदस्त 'कोर्टरूम ड्रामा'ला सुरुवात होणार आहे.

स्मिता शेवाळेची एन्ट्री

या मालिकेत आता एका प्रभावी पात्राची एण्ट्री होणार आहे, ती म्हणजे वकील 'गीतांजली सरंजामे'. ही महत्त्वपूर्ण भूमिका मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील अभिनेत्री स्मिता शेवाळे (smita shewale) साकारणार आहे. स्मिता शेवाळेचा अभिनय नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. तिची बोलण्याची लकब नेहमीच प्रेक्षकांना आवडला आहे, त्यामुळे एका तडफदार वकिलाच्या भूमिकेत त्यांना पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.

कोण आहे गीतांजली सरंजामे?

मालिकेत गीतांजली सरंजामे ही एक अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि अनुभवी वकील म्हणून ओळखली जाते. तिची खासियत अशी की, तिने आजवरच्या कारकिर्दीत एकही केस गमावलेली नाही. ती शांत डोक्याने आणि अचूकतेने प्रतिस्पर्ध्याला मात देण्यासाठी ओळखली जाते. मायाने स्वतःला वाचवण्यासाठी गीतांजलीची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गीतांजलीची कोर्टातील एण्ट्री रणदिवे कुटुंबासाठी आणि विशेषतः जानकीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

अवंतिका विरुद्ध गीतांजली: रणांगण सज्ज

या कायदेशीर लढाईत जानकीची बाजू रणदिवे कुटुंबातील सून अवंतिका लढवताना दिसणार आहे. अवंतिका आणि गीतांजली सरंजामे यांच्यात होणारी ही जुगलबंदी प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे आहे. जानकीच्या सत्याचा विजय होणार की गीतांजली आपल्या बुद्धीचा वापर करून मायाला वाचवण्यात यशस्वी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रोज रात्री १०.३० वाजता ही मालिका पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT