Gautami Patil Nick Shinde Sundara Song released  Instagram
मनोरंजन

Gautami Patil Sundara Song | अखेर रिलीज झालं गौतमी पाटीलचं गाणं “सुंदरा”, निक शिंदेची युनिक हुकस्टेप

Gautami Patil Nick Shinde Sundara Song | गौतमीचा साजशृंगार आणि निकची हटके हुकस्टेप, “सुंदरा” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

स्वालिया न. शिकलगार

Gautami Patil Nick Shinde Sundara Song

मुंबई - गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकतेच हे गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगणा गौतमी पाटील सोबत अभिनेता निक शिंदे झळकला आहे. तसेच गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी या गाण्याला स्वरसाज दिला आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे.

गौतमी पाटील म्हणाली, “कृष्ण मुरारी या गाण्याच्या यशानंतर माझं सुंदरा हे गाणं प्रदर्शित झालं आहे. मी साईरत्न एंटरटेनमेंटचे आभार मानते की, त्यांनी मला कृष्ण मुरारी या गाण्यानंतर सुंदरा या गाण्यात पुन्हा संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही कृष्ण मुरारी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं तसेच प्रेम सुंदरा या गाण्याला द्या.”

गायिका सोनाली सोनवणे सांगते, “गाण्याचं नावच सुंदरा आहे. त्यामुळे तुम्हाला कळलचं असेल गाणं किती सुंदर असेल. खरचं गाणं खूप सुंदर झालं आहे. मला गाताना खूप मज्जा आली. मला खात्री आहे की, तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही थिरकणार आहात या गाण्यावर. मी आणि रोहित राऊतने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं संगीत रोहित नागभिडे यांनी केलं असून वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT