पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कोई मिल गया' आणि 'गदर' फेम अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे दीर्घकाळ आजाराने निधन झाले. टोनी यांनी चित्रपट आणि टीव्ही जगतात आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. टोनी यांनी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, टोनी मिरचंदानी दीर्घकाळ आजारी होते.
टोनी मिरचंदानी हे दीर्घकाळ आजारी होते. आरोग्याच्या अनेक समस्यांशी ते ग्रस्त होते. प्रार्थना सभा सिंधु भवन सिंधी झूलेलाल मंदिर 45, पीजी रोड, सिंधी कॉलोनी बेगमपुर, सिकंदराबाद हैदराबाद, तेलंगाना येथे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.