मनोरंजन

Tunisha Sharma: तुनिषाच्या मृत्यूनंतर आता मालिका सेटवर असतील काउन्सलर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मृत्यूनंतर कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएप्लॉय (FWICE) ने याप्रकरणी महत्त्‍वाचा  निर्णय घेतला आहे. FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्या माहितीनुसार, टीव्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे की, एखाद्या कलाकाराने सेटवर स्वत:चे जीवन संपवले आहे. ही गोष्ट तत्काळ रोखण्याची गरज आहे. यावर आमच्या फेडरेशनद्वारा गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलीय. (Tunisha Sharma)

बीएन तिवारी यांनी सांगितले की, "फेडरेशनचा याआधीही सेटशी संपर्क होता. कास्ट अँड क्रूशी चर्चा करून परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न फेडरेशन करत असे. आज ती स्थिती राहिली नाही. आम्ही सेटवर जाणे बंद केलं. आता लोक आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. तुनिषासोबत जे काही झालं, ते खूप दु:खद आहे. पण, आता पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी  लक्ष द्यायला हवं.

सेटवर ठेवले जातील काउन्सलर

या प्रश्‍नी आम्‍ही प्रोड्यूसर मीटिंगदरम्यान बोलू की, केवळ पैसे कमवणे त्याचं लक्ष्य असणार नाही. तुम्हाला तुमच्या टीमच्या मेंटल हेल्थ विषयी विचार करायला हवा. मीटू महिमेवेळी आम्ही सेटवर लैंगिक शोषणासारख्या गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी एक टीम बनवली होती. आम्ही यावेळीही विनंती करू की, प्रत्येक सेटवर एक काउन्सलर असावा. कलाकारांची काउन्सलिंग खूप गरजेची आहे, असेही तिवारी म्‍हणाले.

आज कलाकारांना पैसे अचानक मिळतात. त्यांना समजत नाही की, आपल्या आयुष्यासोबत काय करायला हवं. प्रत्येक काउन्सलरला आर्टिस्टच्य़ा मेडिकल रिपोर्टची माहिती असायला हवी. त्यांना वेळोवेळी शूटिंगच्य़ा वेळेतील तणावाची माहिती देखील असायला हवी. तुनिषाच्या या पावलाने खरोखर आम्हा लोकांना घाबरवलं आहे. अशा दहशतीत कसं काम होईल. सेटवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे फोनदेखील आले. त्यांना भविष्याची चिंता आहे. एका सेटवर शेकडो लोकांना रोजगार मिळतो. त्यांचं काय होईल. आम्ही आता प्रोड्यूसर असोसिएशनशी बोलणार आहोत.'

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT