Raid 2 arrives on OTT X account
मनोरंजन

Raid 2 arrives OTT | 'राजकारण, सत्ता आणि ब्लॅक मनीचा खेळ..' रेड २ ओटीटीवर दाखल

Raid 2 OTT Release: अजय देवगन-रितेश देशमुखचा चित्रपट 'रेड-२' पाहा 'या' ठिकाणी

स्वालिया न. शिकलगार

Raid 2 arrives on OTT

मुंबई - अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट 'रेड २' आता ऑनलाईन पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमधील अलिकडच्या क्राईम थ्रिलर 'रेड २' मध्ये अजय देवगणने आयआरएस अधिकारी अमय पटनाईकच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. तर राज कुमार गुप्ता पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. २०१८ च्या हिट चित्रपटाचा हा सिक्वेल असून चित्रपटात रितेश देशमुख शक्तिशाली दादाभाई आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे.

राजस्थानमध्ये सेट केलेले हे चित्रपट राजकारण, सत्ता आणि काळा पैसा यांचे मिश्रण आहे. रेड च्या फ्रेंचायझींना आधीच प्रेक्षकांनी पसंती दिलीय, त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केलीय. चित्रपटाने पहिल्या दिवशी १९ कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. तर चित्रपटाचे बजेट केवळ ८० कोटी आहे.

हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे, जो हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीजमध्ये उपलब्ध आहे. २६ जून २०२५ रोजी नेटफ्लिक्स रिलीज करण्यात आला आहे. काल नेटफ्लिक्सने एक्स हँडलवर शेअर केलं आहे. कॅप्शनमध्ये नेटफ्लिक्सने लिहिलं- “आजपासून उलटे काऊंटडाऊन सुरू…अमय पटनायक एक नवे केस आणि त्याच एनर्जीसह परचले आहेत. २६ जूनला नेटफ्लिक्सवर रेड २ पाहा.”

काय आहे ‘रेड २’ ची कहाणी?

‘रेड २’मध्ये अमय पटनायक पुन्हा एकदा एका नव्या केसचा तपास करतात. खलनायक रितेश देशमुख एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, ज्याच्यावर कुणीही संशय घेत नाही. पण अमय याठिकाणी छापा टाकायला जातात. रितेश देशमुखची निगेटिव्ह भूमिका असतानाही लोकांच्या पसंतीस उतरलीय. चित्रपटामध्ये सुप्रिया पाठक-सौरभ शुक्लाने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय अजय देवगनच्या पत्नीच्या भूमिकेत वाणी कपूर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT