Pati Patni Aur Woh Do film set clash
मुंबई : बॉलीवूडचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'पति पत्नी और वो दो'च्या सेटवर दिग्दर्शकाला मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सोबतच क्रू मेंबर सोबतही मारझोड झाल्याची माहिती समोर आलीय. नेमकं काय घडलं?
काही अज्ञात लोकांनी अचानक चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि क्रू मेंबर्सना मारहाण सुरु केली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, शूटिंगवेळी काही स्थानिक लोकानी अचानक सेटवर येऊन मारझोड सुरु केली. रिपोर्टनुसार, हे शूटिंग प्रयागराजमध्ये सुरु आहे.
‘पति पत्नी और वो दो’ची टीम सध्या प्रयागराजमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या दरम्यान, चित्रपटाच्या सेटवर अचानक काही स्थानिक लोक येताता आणि वाद घालू लागतात. यावेळी ज्या व्यक्तीला लोक मारहाण करताना दिसताहेत ती व्यक्ती दिग्दर्शक आहे की नाही याबबात अद्याप पुष्टी झालेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मारहाण करत असताना स्पष्ट दिसत आहे. तसेच चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणताही दावा अथवा स्पष्टीकरण दिले गेलेल नाही.
रेडिटवर शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, शूटिंगच्या सेटवर ३ लोक रागाच्या भरात काहीतरी बोलताना दिसत आहेत. आणि क्रू मेंबर्सना धक्काबुक्की करत आहेत. रिपोर्टनुसार, सेटवर एक कार सीक्वेंस शूट केलं जात होतं. व्हिडिओवर अनेक लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओमध्ये एका रेडिट युजरने लिहिलं, 'विना संरक्षण कसे शूटिंग करत होते हे लोक.' यावर आणखी एका युजरने उत्तर दिलं की, 'पोलिसवाले घटनास्थळी होते, त्यानंतरदेखील ही घटना झाली.'