Friday OTT Releases 
मनोरंजन

Friday OTT Releases|फेस्टिव्ह वीकेंडमध्ये ओटीटीवर जबरदस्त धमाका; कोणत्या सीरीज, चित्रपट पाहता येणार?

फ्रायडे ओटीटी रिलीज:फेस्टिव्ह वीकेंडमध्ये ओटीटीवर जबरदस्त धमाका; कोणत्या सीरीज, चित्रपट पाहता येणार?

पुढारी वृत्तसेवा

हा आठवडा खूपच खास आहे. कारण आठवड्याच्या शेवटी खास चित्रपट आणि सीरीज पाहता येणार आहेत. रक्षाबंधनच्या सणानिमित्त शनिवार आणि रविवारी सुट्ट्या आहेत. त्यात ओटीटीवर चित्रपट-सीरीजचा जबरदस्त धमाका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चांगली मेजवानी असणार आहे. वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. बॉबी देओलच्या ‘बंदर’पासून ते ‘मायकेल’पर्यंत अनेक चर्चेत असलेल्या सिनेमांचा यामध्ये समावेश आहे.

‘बंदर’

बॉबी देओलचा ‘बंदर’ हा सिनेमा 28 ऑगस्टपासून जी5वर स्ट्रीम होणार आहे. अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून बॉबी देओल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासोबत सान्या मल्होत्रा, सपना पब्बी आणि सबा आजाद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा याआधी अनेक मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला आहे. आता प्रेक्षकांना तो ओटीटीवर पाहता येणार आहे.

‘जंगल टेल्स विद मोगली’

मुलांसोबत पाहण्यासाठी काहीतरी शोधत असाल तर ‘जंगल टेल्स विद मोगली’ हा पर्याय ठरू शकतो. मोगलीची ओळखीची कथा या अॅनिमेटेड सीरिजच्या माध्यमातून पुन्हा पाहायला मिळणार आहे. 28 ऑगस्टपासून ही सीरिज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होईल.

‘मायकेल’

किंग ऑफ पॉप मायकेल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित ‘मायकेल’ हा बायोपिकही या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल होत आहे. 29 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. याच वर्षी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हिंदी आणि इंग्रजी भाषेत तो ओटीटीवर उपलब्ध होणार आहे.

‘बबीता सिंह रिपोर्टिंग’

‘बबीता सिंह रिपोर्टिंग’ या सिनेमालाही या आठवड्याच्या ओटीटी रिलीजमध्ये स्थान मिळालं आहे. निमिषा सयाजन, बरुण सोबती आणि अंशुमान पुष्कर हे कलाकार यात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. अंबीएका पंडित यांनी दिग्दर्शन केलं असून अमिता व्यास या चित्रपटाच्या लेखिका आहेत. 28 ऑगस्टला या रोमांचक ड्रामाचा प्रीमियर प्राइम व्हिडीओवर होणार आहे. भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हा सिनेमा हिंदीत पाहता येईल.

‘डार्क मॅटर’ सीझन 2

सायन्स फिक्शनची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डार्क मॅटर’चा दुसरा सीझन महत्त्वाचा पर्याय आहे. या सीझनमध्ये एकूण 10 एपिसोड आहेत. 28 ऑगस्ट 2026 पासून Apple TV वर ही सीरिज पाहता येणार आहे.

‘आय, नोबडी’

पृथ्वीराज सुकुमारनचा ‘आय, नोबडी’ हा अॅक्शन-क्राइम थ्रिलर चित्रपट ओटीटीवर दाखल झाला आहे. मल्याळम भाषेतील हा सिनेमा जुलैमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता 25 ऑगस्टपासून तो जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी वीकेंडला हा सिनेमा पाहण्याचा पर्याय आहे.

‘माय बायस, माय बॉस’

के-पॉप आणि कोरियन ड्रामाचे चाहते असतील तर ‘माय बायस, माय बॉस’ ही सीरिजही पाहता येईल. या सीरिजचा आठवा एपिसोड 25 ऑगस्टला प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला आहे.

‘पार्ट टायमर्स’

‘पार्ट टाइमर्स’ ही तेलुगू वेब सीरिज दोन रूममेट्सची गोष्ट सांगते. दोघी मिळून स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करतात. त्यांच्या मैत्रीभोवती फिरणाऱ्या या कथेत कॉमेडीचीही चांगली फोडणी आहे. 28 ऑगस्टपासून ही सीरिज जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT