उज्जैनची निकिता पोरवालने मिस इंडिया २०२४ चा किताब आपल्या नावे केला  instagram
मनोरंजन

Femina Miss India 2024 : मिस इंडियाचा किताब मिळवणारी कोण आहे निकिता पोरवाल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - निकिता पोरवालने वयाच्या १८ व्या वर्षी टीव्ही अँकर म्हणून आपले करिअर सुरू केले होते. ती अभिनेत्री आणि लेखिकाही आहे. यावेळी तिने फेमिना मिस इंडिया २०२४ चा किताब आपल्या नावे केला. एक्स मिस इंडिया २०२३ नंदिनी गुप्ताने तिला मिस इंडियाचा मुकूट घातला. यावेळी नेहा धूपियाने तिला मिस इंडिया सॅश घातलं. रेखा पांडे ही पहिली रनर-अप आणि आयुषी ढोलकिया दुसरी रनर-अप ठरली. फेमिना मिस इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर निकिताचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आता विजेती निकिता पोरवाल मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.

निकिता पोरवाल झाली मिस इंडिया २०२४ ची विजेती

फेमिना मिस इंडियाचे ग्रँड फिनालेचे आयोजन १६ ऑक्टोबरला मुंबईतील फेमस स्टुडिओमध्ये करण्यात आले होते. माजी मिस इंडिया संगीता बिजलानीने यावेळी शानदार परफॉर्मन्स दिले. यावेळी अभिनेत्री नेहा धूपिया, डान्सर राघव जुयाल आणि अनेक अन्य दिग्गज उपस्थित होते. अनुषा दांडेकर फेमिना मिस इंडिया ज्युरी पॅनेलमध्ये होती. ३० राज्यांमधून फायनालिस्ट ग्रँड फिनालेमध्ये होते.

कोण आहे निकिता पोरवाल?

ब्युटी ऑफ क्वीन निकिता मध्य प्रदेशातील उज्जैनची राहणारी आहे. रिपोर्टनुसार, निकिता पोरवालने आपले शालेय शिक्षण कार्मेल कॉन्वेंट सीनियर सेकेंडरी स्कूलमधून आणि बडोदामध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठमधून शिक्षण घेत आहे. ती एक अभिनेत्रीदेखील आहे. ६० हून अधिक नाटकांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिने २५० पानांचे कृष्ण लीला नाटक लिहिलं आहे.

निकिता पोरवाल 'या' अभिनेत्रीला मानते प्रेरणा

निकिता पोरवालने सांगितलं की, ती मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची खूप मोठी फॅन आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT