अभिनेत्री राधिका आपटे हिने दिली गुड न्यूज! फोटो केले शेअर

Radhika Apte : राधिका आपटे आई होणार
Radhika Apte
अभिनेत्री राधिका आपटे हिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.(Image source- Radhika Apte instagram)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ३९ वर्षांची राधिका आई होणार आहे. राधिका आपटेने तिचे बेबी बंपमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिचे हे फोटो एका इव्हेंटमधील असून त्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते.

राधिकाने अद्याप सोशल मीडियावर याबाबत काहीही जाहीर केलेले नाही. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या 'सिस्टर मिडनाईट' चित्रपटाच्या ब्रिटनमधील प्रीमियरचे रेड कार्पेटवरील फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते.

Radhika Apte is pregnant : गुड न्यूजबद्दल चाहत्यांनी केले अभिनंदन

राधिका आपटे हिने २०१२ मध्ये ब्रिटिश कंपोझर बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्न केले आहे. इन्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राधिकाने ब्लॅक ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून तिने केसांचा बन बांधलेला दिसतो. तिच्या चाहत्यांनी गुड न्यूजबद्दल तिचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "Omg!!! राधिका प्रेग्नेंट, हे किती आश्चर्यचकित आहे.” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने “प्रीमियर आणि गुड न्यूजबद्दल अभिनंदन!'' असे म्हटले आहे.

राधिकाचा मराठी नाटक ते हॉलिवूडपर्यंत प्रवास

राधिकाने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिला बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. राधिकाने तिच्या अभिनयाची सुरुवात थिएटरपासून केली होती. 'नको रे बाबा' हे तिचे पहिले नाटक होते. तिने २००५ मध्ये शाहिद कपूर स्टारर चित्रपट ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर राधिकाने हिंदीसह मराठी, तामिळ, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटात काम केले. त्याशिवाय वेब सीरीज, टीव्ही सीरियल आणि लघुपटही तिने केले आहेत. अमेरिकन स्पाय ड्रामा 'A Call to Spy' मध्ये तिने काम केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news