Fatima Sana Shaikh Fatima Sana Shaikh instagram
मनोरंजन

Fatima Sana Shaikh: "महिलांची नव्हे, पुरुषांची मोरल पुलिसिंग करा"; अभिनेत्री फातिमा सना शेख संतापली, नेमकं काय म्हणाली?

बिहारच्या जमुईमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेने महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिनेत्री फातिमा सना शेख हिनेही या घटनेवर तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Fatima Sana Shaikh

नवी दिल्ली: बिहारच्या जमुईमध्ये अलीकडेच एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा आणि समाजाच्या विकृत मानसिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता अभिनेत्री फातिमा सना शेख हिनेही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "आपण महिलांची मोरल पुलिसिंग करणे थांबवले पाहिजे आणि त्याऐवजी पुरुषांची मोरल पुलिसिंग सुरू केली पाहिजे. त्यामुळे मोठा बदल घडू शकतो." "असे फातिमाने म्हटले आहे.

एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री फातिमा सना शेखने महिलांवरील अत्याचार, मॉरल पोलिसिंग आणि सोशल मीडियावरील बॉडी शेमिंगवरून रोखठोक मते मांडली. फातिमा म्हणाली की, ती १७ वर्षांची मुलगी केवळ आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर गेली होती. तिच्यासोबत जे घडले ते अत्यंत निंदनीय आहे. आज आपण २०२६ मध्ये जगत आहोत, तरीही महिलांवर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. समाजात अजूनही ही अत्यंत हीन आणि नीच मानसिकता कायम असल्याचे तिने म्हटले. या प्रकरणात एका १७ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धैर्याचे तिने कौतुक केले, मात्र अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशी खंतही तिने व्यक्त केली आहे.

"महिलांची नव्हे, पुरुषांची मोरल पुलिसिंग करायला हवी"

महिलांच्या नैतिक तपासणीबाबतही फातिमाने आपली स्पष्ट मते मांडली. ती म्हणाली, "आता आपण सातत्याने महिलांची मोरल पुलिसिंग करणे थांबवून पुरुषांची सुरू केली पाहिजे. त्यामुळे मोठा बदल घडू शकतो. असे नाही की सर्व पुरुष वाईट असतात. खूप चांगले पुरुषही आहेत, पण महिलांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे."

"फक्त आदर करायला शिका"

समाजात कोणत्या प्रकारचा बदल तिला पाहायला आवडेल, असे विचारले असता फातिमा म्हणाली, "मला समाजात अनेक बदल पाहायला आवडतील. सर्व लिंग, जाती आणि वर्गांमध्ये समानता असायला हवी. जर तसे कधी घडले, तर तो एक मोठा बदल असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाचा माणसाला असलेला आदर. तुम्ही कुठून आला आहात किंवा तुमची पार्श्वभूमी काय आहे, याने काही फरक पडू नये. लोकांनी एकमेकांचा आदर करायला शिकले पाहिजे. त्यापेक्षा मोठा बदल दुसरा कोणताही असू शकत नाही. मला वाटते की जर लोकांनी फक्त हे शिकले, तर आपल्या निम्म्या समस्या नाहीशा होतील."

बॉडी शेमिंग करणाऱ्यांना फातिमाचा सवाल

सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या वाढत्या प्रमाणावरही अभिनेत्रीने तीव्र चिंता व्यक्त केली. अलीकडेच अभिनेत्री कटरीना कैफ हिला मातृत्वानंतर सोशल मीडियावर केलेल्या बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर भाष्य करताना ती म्हणाली की, "आजकाल ऑनलाइन ट्रोलिंग प्रचंड वाढले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. अलीकडच्या काळात असे अनेक प्रकार समोर आले आहेत जिथे लोकांच्या शरीरावरून त्यांची टिंगल केली जाते. एखाद्या व्यक्तीचे शरीर कसे असावे, हे ठरवणारे आपण कोण? एखादी व्यक्ती बारीक, जाड, मोठी किंवा लहान असेल, तर त्याशी इतरांना काय देणेघेणे? यात केवळ पुरुषच नव्हे, तर महिलांचाही सहभाग असतो, ही बाब अधिक निराशाजनक आहे," असे ती म्हणाली.

"कदाचित त्या स्वतःच्याच पिंजऱ्यात अडकल्या असाव्यात"

या प्रकारात केवळ पुरुषच नव्हे, तर महिलावर्गही तितकाच सहभागी असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटते. दुसऱ्या महिलांना ट्रोल करणाऱ्या महिलांबद्दल बोलताना फातिमा म्हणाली की, ती म्हणाली, "त्या असे का करतात हे मला माहित नाही. कदाचित त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काही समस्या किंवा घडामोडी सुरू असतील. त्यांच्या आयुष्यात सर्व काही खरोखर ठीक आहे ना, असा विचार मला अनेकदा येतो. कदाचित त्या स्वतःच स्वतःच्या बंधनांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या असू शकतात."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT