120 Bahadur Film Teaser release date announced
मुंबई- १२० बहादुर चित्रपटाची टीजर डेट समोर आलीय. लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी फरहान अख्तरच्या या चित्रपटाचा टीझर रिलीज होईल. यामध्ये ऐ मेरे वतन के लोगो गाणे वाजवले जाईल. चित्रपट निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२० बहादुर हा चित्रपट भारतीय जवानांच्या शौर्यकथेवर आधारित आहे. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या १२० जवानांची ही कथा प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरणार आहे. या चित्रपटाचा टीझर लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाईल. या टीझरमध्ये देशभक्तीपर गीत “ऐ मेरे वतन के लोगो” वापरले जाणार असून त्यातून शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाणार आहे.
एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांचा वॉर ड्रामा असलेल्या १२० बहादूरचा दुसरा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. भारतीय सैनिकांच्या आत्म्याला श्रद्धांजली म्हणून "ए मेरे वतन के लोगों" हे प्रतिष्ठित देशभक्तीपर गाणे टीझरमध्ये दाखवण्यात येईल.
या तारखेचे खास महत्व आहे. कारण, लता मंगेशकर यांच्या आठवणीत हे गाणे निवडण्यात आले आहे. त्यांचे "ऐ मेरे वतन के लोगों" हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिले. तर सी. रामचंद्र यांनी संगीत दिलं आणि लता जी यांनी गायले होते.
फरहान अख्तर म्हणाला, “आजचा दिवस ‘१२० बहादुर’ टीजर २ सादर करणे खूपच खास आहे. हे गीत १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या बहादुर सैनिक आणि शहीद झालेल्यांसाठी लिहिलं होतं. लता जींनी लाईव्ह गायलं होतं. ज्याचे रेकॉर्डिंग आजदेखील संपूर्ण देशाच्या आत्म्याला स्पर्श करते. आमच्या चित्रपटातील संदेश कवी प्रदीप जींच्या मनाला भावणाऱ्या शब्दांशी मिळतेजुळते ठरते.”
चित्रपटाची कहाणी १९६२ च्या रेजांग लाच्या युद्धावर आधारित आहे, हे युद्ध अहीर रेजिमेंटच्या १२० सैनिकांद्वारे लढण्यात आले होते. त्यांनी चीनच्या हजारों सैनिकांना हरवलं होतं. रजनीश घई दिग्दर्शित हा चित्रपट २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. तर रितेश सिधवानी, फरहान अख्तर, अमित चंद्रा निर्मित चित्रपट आहे.