अभिनेता विकास सेठी  Pudhari Photo
मनोरंजन

Vikas Sethi : प्रसिद्ध टिव्ही अभिनेता विकास सेठी यांचे आकस्मित निधन

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेते विकास सेठी यांचे रविवारी (दि.8) निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विकासचे निधन हे हृदयविकाराचा झटक्याने झाल्याचे सांगितले आहे. त्याने अनेक टीव्ही शो कसौटी जिंदगी की आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत दमदार अभिनय केला. याबरोबरच 'कभी खुशी कभी गम' या सुपरहिट चित्रपटा देखील काम केले. मागील काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे अभिनेता नैराश्यात असल्याच्या बातम्या येत होत्या. या अभिनेत्याने वयाच्या ४८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. (Vikas Sethi)

या मालिकांमध्ये विकासने केले काम

विकास सेठी हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. 'कहीं तो होगा', 'ससुराल सिमर का', 'गुस्ताक दिल' आणि 'उत्तरन' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी अभिनय केलेल्या प्रत्येक शोमध्ये त्यांनी चाहत्यांच्या मनावर आपली मोहर उमटवली.

त्यांनी 2018 मध्ये जान्हवी सेठीसोबत लग्न केले. जान्हवीशी लग्न केल्यानंतर विकास जुळ्या मुलांचा पिता झाला. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. पत्नी आणि मुलांसोबतही तो अनेक पोस्ट शेअर करत असे. मात्र, मागील चार महिन्यांपासून त्याने इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नव्हती. त्याने 12 मे रोजी इंस्टाग्रामवर शेवटचा फोटो शेअर केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT