हत्‍या प्रकरणी अभिनेता दर्शनवर आरोपपत्र दाखल

पाेलिसांनी सादर केले २०० हून अधिक परिस्थितीजन्य पुरावे
darshan thoogudeepa
अभिनेता दर्शनला कोठडीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटकमधील बहुचर्चित रेणुकास्वामी हत्या प्रकरणी अभिनेता दर्शन थुगुदीपा यांच्‍यावर बुधवारी (दि.४) बंगळूरु पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दर्शन सध्‍या न्‍यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे प्रकरण?

ऑटोचालक रेणुकास्वामी (३३) याचा मृतदेह ९ जून रोजी बेंगळुरूमधील उड्डाणपुलाजवळ मृतावस्थेत आढळला होता. रेणुकास्वामी याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात झाली होती. या प्रकरणी अभिनेता दर्शन याला जून महिन्‍यात अटक झाली होती. दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडा हिला चाहता रेणुकास्‍वामी याने आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. त्‍यामुळे संतापलेल्‍या दर्शनने रेणुकास्‍वामी याची सुपारी देवून हत्‍या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन आणि पवित्रा गौडासह १५ जणांना अटक केली आहे. रेणुकास्‍वामीच्या शवविच्‍छेदन अहवालात इलेक्‍ट्रिक शॉक देवून छळ करुन त्‍याची हत्‍या करण्‍यात आल्‍याचे म्‍हटलं आहे.

पोलिसांनी गोळा केले २०० हून अधिक परिस्थितीजन्य पुरावे

पोलिसांनी या प्रकरणात 200 हून अधिक परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. यामध्‍ये दर्शन आणि इतर आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याच्या फॉरेन्सिक अहवालांचा समावेश आहे. पुराव्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणावरील छायाचित्राचा देखील समावेश आहे. रेणुकास्वामी आरोपींना मारहाण करू नये, अशी विनंती करताना या फोटोत दिसत आहे. दर्शनाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. रेणुकास्वामी यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे आणि विजेचे झटके देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news