अभिनेता इमरान हाशमी आणि यामी गौतमचा 'हक' चित्रपटाविरोधात शाह बानो यांच्या मुलीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निर्मात्यांनी विना परवानगी चित्रपट बनवल्याचा आरोप तिने केला आहे.
Emraan Hashmi and Yami Gautam Haq Film Legal Notice:
मुंबई -बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा आगामी चित्रपट ‘हक’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शाह बानो प्रकरणावर आधारित असल्याचं म्हटलं जाणाऱ्या या चित्रपटावर आता शाह बानो यांच्या मुलीनेच कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाह बानोच्या मुलीने चित्रपट निर्मात्यांवर विना परवानगी त्यांच्या कुटुंबाच्या कथेनुसार चित्रपट तयार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ‘हक’ या चित्रपटात त्यांच्या आईच्या खऱ्या आयुष्यावर आधारित काही घटनांचा वापर करण्यात आला आहे, पण यासाठी त्यांची संमती घेतलेली नाही.
इमरान-यामी गौतमचा आगामी चित्रपट ‘हक’ची कहाणी शाह बानोशी प्रेरित आहे. शाह बानो बेगम यांच्या मुलीने सिद्दीका बेगमने चित्रपट निर्माता आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला लीगल नोटीस पाठवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोटिसमध्ये चित्रपटाचे रिलीज, प्रमोशन आण स्क्रीनिंगवर स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, हा देखील आरोप लावण्यात आला आहे की, शाह बानो यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी दाखवण्यात आले आहे. आणि त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
सिद्दीका बेगमने तौसीफ जेड वारसी द्वारा चार पार्टीजना नोटीस पाठवलीय. डायरेक्टर सुपर्ण वर्मा, प्रोडक्शन पार्टनर जंगली पिक्चर्स, बावेजा स्टुडियोज, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन इ.
‘हक’ चित्रपटाचं दिग्दर्शन सपुर्ण वर्माने केलं आहे. यामध्ये इमरान हाशमी आणि यामी गौतम महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिला लूक नुकतेच प्रदर्शित झाले होते आणि त्यानंतरच या वादाची ठिणगी पडली. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. यामी गौतम शाह बानोच्या भूमिकेत असेल.
सध्या या नोटिशीवर निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांनुसार, ‘हक’ हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे.