इमरान हाशमीच्या ‘आवारापन 2’ चित्रपटातील लूकचे काही फोटो सेटवरून लीक झाले असून, हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लांब कुरळे केस, ब्लॅक गॉगल आणि रफ अवतारात दिसणारा इमरान चाहत्यांना प्रचंड आवडत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आला आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आवारापन २’ सध्या शूटिंगच्या टप्प्यात असून, नुकतेच या चित्रपटातील इमरानचा लूक सेटवरून लीक झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इमरान हाशमीचा चित्रपट 'आवारापन २'च्या सेटवरून एक फोटो लीक झाला आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यावेळी इमरानचा कुरळे लांब केस आणि डोळ्यावर काळा गॉगल असा लूक व्हायरल झाला आहे.
लीक झालेल्या फोटोंमध्ये इमरान हाशमी लांब कुरळे केस, ब्लॅक गॉगल, वाढलेली दाढी आणि रफ लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा अवतार ‘आवारापन’मधील जुन्या आठवणी ताज्या करत असून, अधिक गडद आणि इंटेन्स स्वरूपात समोर येत आहे. इमरानचा हा तगडा लूक पाहून चाहते पुन्हा एकदा त्याला त्या जुन्या, गंभीर भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
पुढील वर्षी येणार आवारापन २
इम्रान हाशमीचा 'अवारपन २' एप्रिल २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. त्याचा या चित्रपटात तगडा लूक आहे. शबाना आझमी खलनायिकेच्या भूमिकेत आहे. इम्रान हाशमीच्या शस्त्रक्रियेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. हा २००७ च्या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल असून नव्या आवारापनमध्ये काय कथा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘आवारापन’ हा चित्रपट इमरान हाशमीच्या करिअरमधील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातील त्याची भूमिका, संवाद आणि संगीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
लहान केस आणि स्टायलिश ठेवले होते, लीक झालेल्या फोटोमध्ये हाशमीचे खांद्यापर्यंत पोहोचणारे कुरळे केस दिसत आहेत. अभिनेता गडद रंगाचा चष्मा, काळा स्कार्फ आणि ब्लॅक टी-शर्ट घातलेला तो दिसत आहे. २००७ च्या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या मोहित सुरी यांनी केले होते. सिक्वेलसाठी नितीन कक्कर करतील. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिशा पटानी दिसणार आहे. नेहमीच्या ग्लॅमरस भूमिकांपेक्षा पूर्णपणे तिची वेगळी भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे; राजस्थानमध्ये चित्रीकरणादरम्यान ती साध्या पारंपरिक पोशाखात दिसली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या चित्रपटात मुख्य खलनायिकेची भूमिका साकारणार आहेत. पहिल्यांदाच त्याची अशी ही भूमिका असेल. 'अवारपन २' बनवण्याची प्रक्रिया आव्हानांशिवाय नव्हती. थायलंडमधील बँकॉक येथील बिझी शेड्यूलनंतर चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये पूर्ण झाले. पण या महिन्याच्या सुरुवातीला एका ॲक्शन सीनवेळी हाशमीला पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले होते.