Saiyaara Movie
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील 'सैयारा' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून या चित्रपटाने तरूणाई अक्षरशा: वेडे केले आहे. अनेक तरूण- तरूणी चित्रपटगृहातून हुंदके देऊन बाहेर पडत आहेत. सैयारा चित्रपटाबद्दल अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी भावनिक पोस्ट व्हायरल केली असून या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे याने 'सैयारा' या डेब्यू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले असून त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींहून अधिक कमाई केली असून हा चित्रपट तरूणाईच्या गाळ्यातला ताईत बनला आहे. चित्रपट पाहून तरूणाई भावूक झाल्याने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे अपूसकच तरूणाईच्या जिव्हारी लागलेला हा चित्रपट नेमका आहे तरी कसा? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटाबद्दल अहमदाबाद वाहतूक पोलिसांची 'X' आकाऊंटवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. 'सैयारा' या चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत "तुमच्या सैयारासोबत (प्रेयसीसोबत) फिरायला जात आहात? तर हेल्मेटलाही घेऊन जा.. नाहीतर तुमचीही प्रेमकथा अपूर्ण राहील." असे त्यांनी लिहले आहे.
तरूणाईच्या मनावर भुरळ घालणारी हृदयस्पर्शी कथा 'सैयारा' या चित्रपटातून मांडण्यात आल्याने या चित्रपटाने तरूणाईच्या मनाचा ठाव घेतला आहे. या चित्रपटाची कथा आपल्या आयुष्याला भावनिकदृष्ट्या स्पर्श करत असल्याने तरूणाईसाठी हा चित्रपट जिव्हाळाचा बनला आहे. चित्रपट पाहून भावूक झालेल्या तरूण- तरूणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या चित्रपटाबद्दल आणखीन उत्सुकता वाढली आहे.