एल्विश यादवचा लियोनल मेसीसोबतचा क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हायरल फोटोंमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, एल्विश यादव आणि जन्नत जुबैर यांचे एकत्रित फोटो पाहून कॉमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. मात्र, या भेटीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनल मेसी सध्या भारतात आहे. तो 'गोट इंडिया टूर'साठी १३ ते १५ डिसेंबर पर्यंत येथील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला. यादरम्यान, बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक निवडक सेलेब्सना त्याची भेट घेता आली. यामध्ये शाहरुख खान, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अजय देवगन, शिल्पा शेट्टी आणि शाहिद कपूर सारखे सेलेब्सची नावे होती. आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादवने देखील त्याची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. यावेळी तिच्यासोबत टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैर देखील होती. दोघांच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
काय लिहिलं एल्विशने?
एल्विशने फोटो पोस्ट करत लिहिले- एल्विश यादव -जन्नत जुबैरने ज्वॉईंट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. दोघे लियोनल मेसीसोबत पोझ देत आहे. जन्नतने फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आम्ही मेसीला भेटलो. काय शानदार दिवस आहे. खूप साऱ्या प्रेमासोबत भारतात स्वागत आहे.' (We met Messi!! What an amazing day✨ Welcome to India 🇮🇳 So much love. Special Thanks To @officialpuch.ai)
Puch AI ही एक AI असिस्टंट सेवा आहे, जी युजर्सना त्यांच्या भाषेत जसे हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, इ. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि माहिती शोधण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
यास टॅग करत एल्विशने आभार मानले आहेत. त्यामुळे त्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटो कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. अनेकांनी त्याच्या या फोटोला रेड हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केला आहेत. तर अनेकानी ते एआय जनरेटेड फोटो असल्याचे म्हटले आहे. तिसरीकडे काहींचे म्हणणे आहे की, एल्विशला मेसीसोबत पाहून अनेक जळत आहेत.
'लाफ्टर शेफ्स-३'मध्ये एल्विश-जन्नत जुबैर
एल्विश-जन्नत दोघेही 'लाफ्टर शेफ्स सीजन ३' मध्ये पाहिलं जाऊ शकतं. या आठवड्यात शोमध्ये माधुरी दीक्षित गेस्ट बनून येणार आहे, याचा प्रोमो आधीच रिलीज झाला आहे.