राष्ट्रीय पुरस्कार विजेता विक्रांत मेस्सी याच्या पदरात आता धर्मा प्रॉडक्शनचा नवीन सिनेमा पडला आहे. विक्रांत आता दोस्ताना 2 मध्ये दिसणार आहे. नुकतेच त्याने ही गोष्ट शेयर केली आहे. या सिनेमात विक्रमचा आतापर्यंतचा सगळ्यात वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)
या सिनेमासाठी यापूर्वी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर हे दिसणार होते. पण यानंतर धर्माने पूर्ण कास्टिंग बदलत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आता कार्तिकच्या जागी विक्रांतची वर्णी लागली आहे.
या सिनेमाबाबत बोटलां विक्रांत म्हणतो, ‘तुम्ही मला लवकरच असे करताना पाहणार आहात. मला वाटते ही बातमी खरे तर आधीच समोर आली आहे. मी माझा धर्मा प्रॉडक्शनचा पहिला सिनेमा करत आहे. यात तुम्ही मला अगदी वेगळ्या अवतारात पाहू शकाल. आम्ही युरोपमध्ये एकेठिकाणी शूटिंग करत आहोत.’
विक्रांतने सहकलाकार म्हणून लक्ष्य ललवाणी दिसणार आहे. पण या सिनेमात अभिनेत्री कोण दिसणार याबाबत मात्र त्याने बोलणे टाळले. कदाचित करण या सिनेमातून एखाद्या नव्या अभिनेत्रीला लॉंच करू शकतो.
2021मध्ये धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाही घोषणा केली होती. पण त्यानंतर त्यांनी एक पोस्ट शेयर केली होती. ज्यात लिहिले होते की काही मतभेदांमुळे या सिनेमाचे कास्टिंग पुन्हा केले जाणार आहे. अर्थात यावेळी करण आणि कार्तिकमध्ये वाद झाल्याचेही समोर आले होते. यानंतर विक्रांतचे नाव मुख्य भूमिकेसाठी समोर आले आहे.
दोस्ताना हा रोम कॉम 2008मध्ये रिलीज झाला होता. तरुण मनसुखानीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर हिरू आणि कारण जोहर यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या.