Doraemon Movie pudhari
मनोरंजन

Doraemon Movie: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणची 'डोरोमोन' सोबत टक्कर; पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर नोबिताची धमाल, तारीख झाली जाहीर

Anirudha Sankpal

Doraemon Movie: भारतात गेल्या दोन दशकांपासून टीव्ही स्क्रीवर मुलांना आणि मोठ्यांना देखील खिळवून ठेणारा डोरेमोन आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. डोरोमोन चाहत्यांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली असून डोरेमोन द मुव्ही: न्यू नोबिता अँड द कॅसल ऑफ द अंडरसी डेविल' हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी भारतात सर्व चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्यांदाच भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोरेमोन चित्रपट रिलीज होत आहे.

विशेष म्हणजे २ ऑक्टोबरला डोरेमोन हा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी येणारा एकमेव चित्रपट नाहीये. बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणचा दृश्यम ३ देखील रिलीज होणार आहे. गांधी जयंतीनिमित्त चाहत्यांना एका बाजूला डोरेमोन तर दुसऱ्या बाजूला विजय साळगावकर पाहता येणार आहे. हा अत्यंत विचित्र असा क्लॅश बॉक्स ऑफिसवर होणार आहे.

खोल समुद्रामधील मैत्री आणि भन्नाट सफर

डोरेमोनचा हा नवा चित्रपट मैत्री, साहस आणि अनोळखी जगाचा शोध असा थरारक पटकथेवर आधारित असणार आहे. हा चित्रपट टीव्ही असाही आणि पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्स हे मिळून भारतात रिलीज करणार आहेत. हा चित्रपट हिंदी पाठोपाठ तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील रिलीज होणार आहे.

या ऐतिहासिक रिलीजला स्मरणीय बनवण्यासाठी ब्लॅक व्हाईट ऑरेंज नावाच्या कंपनीने देशभरात एक मोठे प्रमोशनल कॅम्पेन सुरू केले आहे. दुसरीकडे टीव्ही असाही आणि पीव्हीआर आयनॉक्स थिएटर रिलीजची जबाबदारी सांभाळत आहे.

अजय देवगण दृष्यम ३ शी भिडणार

ज्यावेळी अजय देवगण सोबत या डोरेमोनचा क्लॅश होणार म्हटल्यावर या रिलीजची चर्चा तेव्हा जास्त होऊ लागली. अजय देवगणचा दृष्यम ३ देखील २ ऑक्टोबरलाच रिलीज होणार आहे. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून याचे आधीचे दोन भाग चांगले गाजले होते.

एका बाजूला युवक प्रेक्षकवर्ग हा दृष्यमसाठी उत्सुक असेल तर दुसरीकडे लहान मुले आणि फॅमिली ही डोरेमोनसाठी क्रेझी असेल. त्यामुळं हा क्लॅश रंजक होणार हे नक्की. या स्पर्धेत कोण पुढे जाणार हे पाहणे देखील उत्सुकतेचं राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT