रेखाचं एका मॅगजीनसाठी फोटोशूट गाजलं होतं Rekha Instagram
मनोरंजन

प्रेमाच्या अतिरेकाने प्रेम हरवतं का? रेखाचे हे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल वेडे!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेखाला बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हटलं जातं. अभिनयचं नाही तर तिचं सौंदर्य आणि वेशभूषा इतरांपेक्षा वेगळं ठरतं. रेखाने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रोफेशनल लाईफ सोबत रेखा पर्सनल लाईफ विषयी चर्चेत राहते. दरम्यान, रेखाचे प्रेमाविषयी एक खूप सुंदर उत्तर आणि मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट खूप चर्चेत राहिलं होतं. यानिमित्ताने तिला एका मुलाखतीत प्रेमाबद्दल विचारण्यात आलं होतं.

प्रेमाबद्दल काय म्हणाली होती रेखा?

एका मुलाखतीत जेव्हा रेखाला विचारण्यात आलं की, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वा एखाद्या व्यक्तीवर खूप अधिक प्रेम करता, तेव्हा प्रेमाच्या अतिरेकाने प्रेम हरवते का? या प्रश्नावर उत्तर देताना रेखाने म्हटले की, ‘नाही एकदा जोडलं गेलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं तर ते नेहमीसाठी राहतं. कधी आपण त्याहून अधिक प्रेम करतो तर कधी तितकचं प्रमे पुरेसं असतं.' रेखाने खूप मनातून दिलेल्या या उत्तराची चर्चादेखील झाली होती. रेखाचे हे उत्तर फॅन्सच्या पसंतीस उतरले होते.

रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन असे आहे. तिचा जन्म चेन्नईमध्ये १० ऑक्तोबर, १९५४ रोजी झाला होता. रेखाला सुरुवातीला हिंदी बोलण्यात अडचण व्हायची. बाल कलाकारानंतर तेलुगु चित्रपट 'रंगुला रत्नम'मध्ये काम केलं होतं. बॉलीवूडमध्ये १९७० मध्ये आलेला चित्रपट 'सावन भादो'मधून आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर तिची केमिस्ट्री खूप गाजली. ७० चया दशकात रेखा - अमिताभ सर्वात हिट जोडी होती. 'मुकद्दर का सिकंदर', 'राम बलराम', 'खून पसीना' यासारख्या चित्रपटांमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अमिताभ - रेखा यांचा पहिला चित्रपट 'दो अजनबी' रिलीज झाला. १९८१ मध्ये चित्रपट 'सिलसिला'मध्ये रेखा अखेरीस अमिताभ यांच्यासोबत दिसली. ‘उमराव जान’, 'कामसूत्र' यासारख्या १८० हून अधिक चित्रपटात रेखाने काम केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT