कन्नड अभिनेत्री आणि पूर्व बिग बॉस स्पर्धक दिव्य सुरेश चांगलीच अडचणीत आली आहे. बेंगळुरूतील एका हिट अँड रन प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहे. यात ज्या गाडीने तीन व्यक्तीना ठोकर मारली ती दिव्या सुरेश चालवत होती. (Latest Entertainment News)
या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की कार पूर्व बिग बॉस स्पर्धक दिव्या सुरेश चालवत होती. ही घटना 4 ऑक्टोबरला दुपारी 1.30 वाजता नित्या हॉटेलजवळ झाला. या अपघातात तीन लोक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी जप्त केली असून दिव्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रस्त्यावरील कुत्र्यांपासून वाचण्यासाठी आपल्या बाइकला थोडे वळवले. यावेळी दिव्याच्या कारने या बाइकला धडक मारली. बाइकवरील किरण आपल्या बहिणीसह अनुशा, अनीता यांच्यासह चालल्या होत्या. यानंतर दिव्या तिथेही न थांबता निघून गेल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
अपघातग्रस्त किरणने तीन दिवसांनंतर केस फाइल केली आहे. यानुसार भारतीय दंड संहिता 281 नुसार आणि 125 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दिव्या सुरेश ही कन्नड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी टेलिव्हिजन इंडस्ट्रीम काम करते. 'चिट्टे हेज्जे' या मालिकेतून करियरची सुरुवात केली. याशिवाय तिने मिस इंडिया साऊथ 2017 चे टायटलही जिंकले. याशिवाय तिने बिग बॉस कन्नडच्या आठव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणूनही सहभाग नोंदवला आहे.