Dipika Kakar the diagnosed 2nd stage Liver Cancer  Instagram
मनोरंजन

Dipika Kakar the diagnosed Liver Cancer |'कॅन्सर शब्द ऐकणे देखील भयावह', दीपिका कक्कडला स्टेज २ लिव्हर कॅन्सर

Dipika Kakar the diagnosed 2nd stage Liver Cancer |'दीपिका कक्कडला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर' झाल्याचे वृत्त समोर आले आहे

स्वालिया न. शिकलगार

Dipika Kakar the diagnosed 2nd stage Liver Cancer

मुंबई - टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने पत्नी दीपिका कक्कडच्या स्टेज २ लिव्हर कॅन्सरबद्दल सांगितले आहे. अश्रू रोखत शोएबने त्याच्या आयुष्यातील 'सर्वात कठीण काळ' असल्याचे म्हटले आहे. त्याने दीपिका बरी व्हावी, अशी आशा व्यक्त केलीय.

दीपिकाने सांगितले होते की, डॉक्टरांना तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळला आहे, आता ती शस्त्रक्रियेची वाट पाहत आहे. तो म्हणाला, 'परमेश्वराच्या कृपेने, स्कॅन रिपोर्ट स्पष्ट झाला आहे. व्हायरस किंवा त्याच्या पेशी शरीरात इतरत्र कुठेही पसरलेल्या नाहीत. जे काही आहे ते फक्त ट्यूमरपुरते मर्यादित आहे आणि एकदा ट्यूमर काढून टाकला की, परिस्थिती सुधारेल. सध्या, डॉक्टर म्हणत आहेत की सर्वकाही नियंत्रणात आहे. भविष्यात काय होणार आहे हे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे.'

हा आतापर्यंतचा सर्वात कठीण काळ-शोएब

शोएब म्हणाला, 'सतत खोकल्यामुळे शस्त्रक्रिया थोडीशी उशिरा झालीय तरीही, मला वाटते की प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या कधी ना कधी अशा टप्प्याचा सामना करावा लागतो. आमच्यासाठी, हा कदाचित सर्वात कठीण टप्पा आहे. तरीही, आम्ही परमेश्वराचे तितकेच आभारी आहोत. ही एक मोठी आरोग्य चिंता आहे यात काही शंका नाही. पण डॉक्टर ते हाताळतील असा विश्वास आहे. आम्हाला खात्री ​​आहे की ते सहजपणे ठिक होऊ शकते.'

दीपिका म्हणाली - कर्करोग हा शब्द ऐकणे भयावह आहे

दीपिका देखील तिच्या पतीसोबत व्हिडिओमध्ये दिसली. तिने सांगितले की, 'आम्ही डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवत आहोत आणि त्यांच्या विश्वासातून बळ मिळवत आहोत. अर्थात, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कर्करोग हा शब्द ऐकणे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी भयावह आहे. परंतु आम्ही दृढ राहतो, विश्वास ठेवतो आणि सर्वोत्तमची आशा करतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT