Dino Morea reached at ED Office Mithi river desilting case  Instagram
मनोरंजन

Dino Morea Mithi river desilting case | मिठी नदी प्रकरण; चौकशीसाठी डिनो मोरिया ईडी कार्यालयात हजर

Dino Morea Mithi river desilting case ED office | ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी डिनो मोरिया कार्यालयात हजर झाला.

स्वालिया न. शिकलगार

Mithi river desilting case Dino Morea at ED Office

मुंबई - मिठी नदीतील गाळ काढण्याचे ६५ कोटींचे कंत्राट घेऊन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया, त्याचा भाऊ आणि या संबंधित संशयितांची ईडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अभिनेता डिनो मोरिया मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर झाला आहे.

जेव्हा डिनो ED ऑफिस बाहेर पोहोचला, तेव्हा मीडियाने त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो हसताना दिसला. पण त्याने मीडियाला कठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

मीठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी डिनो मोरियाच्या घरासह मुंबईतील १५ ठिकाणी छापेमारी केली होती. एका वृत्तसंस्थेनुसार, ही कारवाई डिनो मोरिया आणि त्याच्या भावाच्या घरासहित मुंबईमध्ये अन्य ठिकाणीही करण्यात आली होती. शिवाय डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थ‍िक गुन्हे शाखा अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली होती. या प्रकरणात त्याचा भाऊ सँटिनोचे देखील नाव समोर आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT