Diljit Dosanjh Royal entry at Met Gala 2025 in Newyork  Instagram
मनोरंजन

Met Gala Diljit Dosanjh | ड्रेस ते नेकलेसपर्यंत सर्व काही चमकदार; 'पंजाब दा पुत्तर' दिलजीत दोसांझने गाजवलं मेट गाला

Met Gala 2025 Diljit Dosanjh Royal Look | ग्लॅमरचा बादशाह! दिलजीतने मेट गालावर सगळी लाईमलाईट लुटली

स्वालिया न. शिकलगार

Diljit Dosanjh Royal entry at Mat Gala 2025

न्यू-यॉर्क : मेट गाला २०२५ ची थीम सुपरफाईन टेलरिंग ब्लॅक स्टाईल अशी होती. यावेळी हॉलिवूड, बॉलिवूड दिवा रेड कार्पेटवर उतरल्या. तर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, कियारा आडवाणी, नताशा पूनावाला, दिलजीत दोसांझ, प्रियांका चोप्रा हे स्टार्स मेट गालाच्या रेड कार्पेटवर चमकले. खास म्हणजे, गायक, अभिनेता दिलजीत दोसांझचा लूक लक्षवेधी ठरला.

रॉयल लूकमध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री

मेट गाला २०२५ मध्ये पंजाबी सुपरस्टार, गायक दिलजीत दोसांझने पंजाबी ट्रॅडिशनल आऊटफिटमध्ये डेब्यू केलं आहे. त्याने नेपाळी-अमेरिकन डिझायनर प्रबल गुरुंग याने डिझाईन केलेला आऊटफिट परिधान केला होता. रॉयल लूक पाहून असं वाटत होतं की, त्याने पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंहला ट्रिब्यूट दिलं आहे.

दिलजीत दोसांझच्या आऊटफिटमध्ये खास काय?

दिलजीत दोसांझने मेट गालासाठी आयवरी शेरवानी सूट परिधान केला होता. त्यामागे एक केप देखील होतं. त्या केप मध्ये पंजाबचा नकाशा आणि काही पंजाबी अक्षरांनी सजवलेली गोल्डन एम्ब्रॉयडरी होती. वरून सुंदर पगडीने दिलजीतचा लूक अगदी खास बनवला.

दिलजीत दोसांझचा रॉयल डेब्यू

दिलजीतने घातलेली ज्वेलरी पाहता मोती आणि पन्ना मल्टीलेयर नेकलेस परिधान केला होता. वरून एक ग्रीन कलरचा चोकर घातला होता. सर्वांची नजर फक्त दिलजीतच्या नेकलेसवरच होती. मुळात हा नेकलेस १९२८ मध्ये कार्टियरने पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंहसाठी तयार केला होता. महाराजासाठी तयार करण्यात आलेली ही सर्वात महाग ज्वेलरी पैकी एक आहे.

दिलजीत दोसांझचा महाराजा लूक पाहून काय म्हणाले फॅन्स?

मेट गाला २०२५ मधील फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिलजीतचा डेब्यू इतका लक्षवेधी ठरेल, असा अंदाजही लावला नव्हता. एकाने म्हटलंय-ट्रॅडिशनल लूकमध्ये ‘पंजाबची शान’. आणखी एकाने म्हटलंय - ‘पंजाबी आ गए ओये’. तर काहींनी त्याला ट्रोल देखील केले आहे. ‘ये मेट गाला आहे की लग्नाची वरात’, अशी एकाने टीका केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT