dil bedhund 
मनोरंजन

Dil Bedhund : बेधुंद व्हायची प्रतीक्षा संपली; यादिवशी रिलीज होणार ‘दिल बेधुंद’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमकथा म्हटलं की, साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचं एक कथानक, नायक-नायिका, भावना उचंबळून आणणारं संगीत आणि अत्यंत 'प्रेमळ' वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो. मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात जातात. (Dil Bedhund ) 'अरे हे तर आधीच माहिती होतं', असं म्हणतात आणि परत येतात! प्रेमकथेवर आधारीत तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपटही त्याला काही अंशी कारणीभूत असतात. पण अर्थात, सगळेच चित्रपट असे एकाच धाटणीतले नसतात बरं! प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी 'दिल बेधुंद' सज्ज झालाय! (Dil Bedhund )

आधी टायटल आणि नंतर पोस्टर लाँचला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. 'दिल बेधुंद'चा ट्रेलरही लाँच झाला. हंसराज जगताप आणि नवोदित अभिनेत्री साक्षी चौधरी यांची जोडी सर्वांसमोर आली.

चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा हंसराज जगताप याची वेगळी ओळख मराठी प्रेक्षकांना करून देण्याची गरजच नाही. 'धग'मधल्या त्याच्या अभिनयाला स्पेशल ज्युरी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे मराठी जनमाणसात तो सहज जाऊन पोहोचला. पण त्याच्यासोबत चित्रपटाची अभिनेत्री अर्थात साक्षी चौधरीही ट्रेलरमध्ये दिसत आहे. वयानं हंसराजपेक्षा काहीशी मोठी दिसणारी साक्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधून आहे. या दोघांसमवेत जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

१९ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ओशियन कर्व्हज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवम पाटील आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गुड्डू देवांगन यांनी कथा लिहिली आहे. चित्रपटाचं संगीत स्वप्निल शिवणकर यांचं असून गाणी के. स्वामी यांनी लिहिली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT