Kuberaa OTT Release Controversy Instagram
मनोरंजन

Kuberaa OTT Release Controversy |'चित्रपट रिलीज झाला नाही तर १० कोटी कापणार', वादात अडकला धनुषचा 'कुबेरा'

Nagarjuna- Dhanush-Rashmika Mandanna | रिलीजच्या आधी वादात अडकली 'कुबेरा'

स्वालिया न. शिकलगार

Dhanush Nagarjuna Akkineni Rashmika Mandanna Kuberaa

मुंबई - Pippi Pippi Dum Dum Dum हे कुबेरामधील गाणे आज लॉन्च होतंय. या लॉन्चप्रसंगी अभिनेता नागार्जुन, अभिनेता धनुष, अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट ओटीटीवर रिलीजवरून वादात अडकला आहे. अभिनेता धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपट कुबेराचे निर्माते सुनिल नारंग यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओ विषयी मोठा खुलासा केला आहे.

सध्या कुबेरा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. आधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. आता जूनमध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. दरम्यान, चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला.

'कुबेरा' ओटीटी रिलीज वरून वाद

सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते कुबेरा सुनिल नारंग यांनी खुलासा केला की, 'मी त्यांच्याकडे जुलै पर्यंतचा वेळ मागितला. कारण पोस्ट-प्रोडक्शनमध्ये उशीर होऊ शकतो. परंतु, त्यांनी स्पष्ट सांगितलं की, जर चित्रपट २० जून रोजी रिलीज झाला नाही तर डीलमधून १० कोटी कट करणार.' सुनिल यांनी पुढे सांगितलं की, 'ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता चित्रपटांच्या रिलीजवर प्रभाव टाकत आहे. तेलुगु चित्रपट सामान्यपणे २८-३० दिवसांत ओटीटीवर येतात. परंतु, प्राईम व्हिडिओचा दबाव निर्मात्यांसाठी अडचणी निर्माण करत आहे.'

काय आहे कुबेरा चित्रपटाची कहाणी?

कुबेरा एक पॅन-इंडिया सोशल थ्रिलर असून दिग्दर्शन शेखर कम्मुला करत आहेत. चित्रपटात धनुष एक भिखारीच्या भूमिकेत आहे. तर नागार्जुन एक श्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारतोय. रश्मिका मंदाना, जिम सरभ, दलीप ताहिल यासारखे स्टार्सची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, हिंदी, कन्नड, मल्याळममध्ये २० जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT